लखनौतून अपहरण अन् हरियाणात धर्मांतरण, आरोपी सलमान अटकेत
By ऑनलाइन लोकमत | Published: November 24, 2022 10:16 AM2022-11-24T10:16:54+5:302022-11-24T10:18:03+5:30
आरोपी सलमानने स्वतःचे नाव शाम असल्याचे भासवून अल्पवयीन मुलीशी मैत्री केली होती.
लखनौ:उत्तर प्रदेशची राजधानी लखनौमध्ये लव्ह जिहादचे धक्कादायक प्रकरण समोर आले आहे. एका तरुणाने आधी आपली धार्मिक ओळख लपवून अल्पवयीन मुलाशी मैत्री केली. यानंतर चाकूच्या धाकावर अल्पवयीन तरुणीचे अपहरण करून तिचे बळजबरीने धर्मांतर केले. यानंतर तिला हरियाणा येथे नेऊन तिच्याशी लग्न केले आणि तिच्यावर वारंवार बलात्कार केला.
आरोपी सलमान स्वतःचे नाव शाम असल्याचे भासवून तरुणीच्या संपर्कात आला होता. त्याने आधी मैत्री केली आणि यादरम्यान आरोपीने मुलीला धमकाऊन पळवून नेले. यादरम्यान आरोपीने मुलीचे चाकूच्या धाकावर धर्मांतर करून तिच्याशी लग्न केले आणि तिला हरियाणात नेले. तिथेही तिच्यावर वारंवार बलात्कार केला.
मुलीच्या मोबाईलचे लोकेशन ट्रेस केल्यानंतर लखनौ पोलिसांनी हरियाणा गाठून मुलीला ताब्यात घेतले आणि आरोपीला अटक केली. पोलिसांनी आरोपीविरुद्ध धर्मांतर, लव्ह जिहाद, अपहरण आणि बाललैंगिक अत्याचार या कलमांखाली गुन्हा दाखल करून या प्रकरणाचा तपास सुरू केला आहे. सलमान असे आरोपीचे नाव असल्याचे पोलिसांनी सांगितले.