स्वतःचे केले अपहरण; वडिलांकडेच मागितली खंडणी, मोबाईल लोकेशनवरून छडा 

By ऑनलाइन लोकमत | Published: August 20, 2022 08:27 AM2022-08-20T08:27:03+5:302022-08-20T08:27:41+5:30

चिकन आणण्यासाठी गेलेल्या तरुणाने स्व:ताच्याच वडिलांना दाेन लाखांची खंडणी मागत स्वतःचेच अपहरण नाट्य घडवून आणले.

kidnapping himself ransom demanded from father himself release from mobile location | स्वतःचे केले अपहरण; वडिलांकडेच मागितली खंडणी, मोबाईल लोकेशनवरून छडा 

स्वतःचे केले अपहरण; वडिलांकडेच मागितली खंडणी, मोबाईल लोकेशनवरून छडा 

Next

लोकमत न्यूज नेटवर्क 

उल्हासनगर : १४ ऑगस्टला चिकन आणण्यासाठी गेलेल्या विजयकुमार भारती या तरुणाने स्व:ताच्याच वडिलांना दाेन लाखांची खंडणी मागत स्वतःचेच अपहरण नाट्य घडवून आणले. मध्यवर्ती पोलिसांनी त्याचा बनाव उघड करून कर्नाटक येथील रायचूर रेल्वे स्टेशनवर अटक केली. 

उल्हासनगर कॅम्प नं. ३ शांतीनगर परिसरात चंद्रकांत भारती हे कुटुंबासह राहतात. त्यांचा २२ वर्षीय मुलगा विजयकुमार भारती १४ ऑगस्टला रात्री ८.३० वाजता चिकन आणण्यासाठी घराबाहेर पडला. ताे घरी न परतल्याने वडील चंद्रभान भारती यांच्यासह नातेवाइकांनी त्याचा शोध घेतला असता ताे सापडला नाही. १५ ऑगस्टला पहाटे १.३० वाजता वडील भारती यांना एका मोबाइलवरून फोन आला. फोन करणाऱ्यांनी विजयकुमार हवा असल्यास दाेन लाख द्या, अशी मागणी केली. घाबरलेल्या भारती यांनी नातेवाइकांसह मध्यवर्ती पोलीस ठाणे गाठून झालेला प्रकार पोलिसांना सांगितला. पोलिसांनी मोबाइलचे लोकेशन आणि कॉल रेकॉर्ड तपासले असता ते कर्नाटकातून आल्याचे उघड झाले. तसेच १५ ऑगस्टला विजयकुमार हा एकटाच रेल्वे स्थानकात सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला.

मोबाईल लोकेशनवरून छडा 

- मध्यवर्ती पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक मधुकर कड यांनी एक पथक कर्नाटक राज्यात पाठविले. 

- पोलीस पथकाने मोबाइल लोकेशन आणि कॉल रेकॉर्डवरून विजयकुमारला स्थानिक रेल्वे पोलिसांच्या मदतीने रायचूर रेल्वेस्टेशनवर ताब्यात घेतले. 

- पैशासाठी स्वतःच्या अपहरणाचा डाव रचून वडिलांकडून दाेन लाखांची खंडणी मागितल्याचे तपासात उघड झाले. 

- मध्यवर्ती पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक कड यांनी शुक्रवारी पत्रकार परिषद घेऊन याविषयी माहिती दिली. अधिक तपास पोलीस करीत आहेत.
 

Web Title: kidnapping himself ransom demanded from father himself release from mobile location

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.