अल्पवयीन मुलीचे अपहरण; दोघा मित्रांवर गुन्हा

By ऑनलाइन लोकमत | Published: October 18, 2018 09:05 PM2018-10-18T21:05:19+5:302018-10-18T21:05:37+5:30

तपास पोलीस उपनिरीक्षक रामकृष्ण खैरनार करीत आहेत. संशयित गिऱ्हाईकांकडे संपर्क साधत होते. नंतर व्यवहार पक्का झाल्यानंतर गिऱ्हाईकांना युवती पुरविण्यात येत होते. कोलवा पोलिसांना ही माहिती मिळाली होती. त्याच्या आधारे पोलिसांनी सापळा रचून या वेश्याव्यवसायाचा पर्दाफाश केला.

Kidnapping a minor girl; Crime against two friends | अल्पवयीन मुलीचे अपहरण; दोघा मित्रांवर गुन्हा

अल्पवयीन मुलीचे अपहरण; दोघा मित्रांवर गुन्हा

Next

जळगाव - अमळनेर तालुक्यातील जवखेडा येथे एका साडेसतरा वर्षाच्या तरुणीला  फूस लावून पळवून नेल्याची घटना घडली. याबाबत आरोपी व त्याला मदत करणाऱ्या मित्राविरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे. जवखेडा येथील एका  अल्पवयीन मुलीचे आईवडील धुळे येथे अंत्ययात्रेला गेले असताना मुलगी घरी एकटी होती. त्याचवेळी बंटी त्र्यंबक पवार याने फूस लावून मोटारसायकलवर बसवून नेले व गावाबाहेर असलेल्या त्याचा मित्र तात्या संभाजी मालचे  याच्या ताब्यात दिले. मालचेने तिला आमिष दाखवून पळवून नेले. सायंकाळी आईवडील घरी आले असता लहान नातीने दुपारची हकीकत सांगितली त्या अल्पवयीन मुलीने जाताना सोबत पैसे नेल्याचेही उघडकीस आले आहे. मुलीच्या वडिलांनी अमळनेर पोलीस स्टेशनला फिर्याद दिल्यानंतर बंटी व तात्या यांच्याविरुद्ध भा. दं. वि. कलम 363, 366 प्रमाणे अपहरणाचा गुन्हा नोंदविण्यात आला आहे. तपास पोलीस उपनिरीक्षक रामकृष्ण खैरनार करीत आहेत. संशयित गिऱ्हाईकांकडे संपर्क साधत होते. नंतर व्यवहार पक्का झाल्यानंतर गिऱ्हाईकांना युवती पुरविण्यात येत होते. कोलवा पोलिसांना ही माहिती मिळाली होती. त्याच्या आधारे पोलिसांनी सापळा रचून या वेश्याव्यवसायाचा पर्दाफाश केला.

Web Title: Kidnapping a minor girl; Crime against two friends

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.