मुलींच्या अपहरणाचे प्रमाण 22 पट वाढले
By ऑनलाइन लोकमत | Published: July 29, 2019 07:27 PM2019-07-29T19:27:25+5:302019-07-29T19:31:17+5:30
माहिती माहितीच्या अधिकारात काढलेल्या तपशिलातून उघड झाली आहे.
मुंबई - मुंबई शहरात सन 2013 तुलनेत 2018 मध्ये मुलींचे अपहरण 22 पट वाढले असल्याची धक्कादायक माहिती माहितीच्या अधिकारात काढलेल्या तपशिलातून उघड झाली आहे. आरटीआय कार्यकर्ते शकील अहमद शेख यांनी मुंबई पोलिसांकडून याबाबत माहिती काढली आहे.
आरटीआय कार्यकर्ते शकील अहमद शेख यांनी मुंबई पोलीस विभागाकडे वर्ष २०१८ मध्ये मुंबईत वयस्कर आणि लहानमुलांची चोरी किंवा अपहरण/ हरवले आहे. तसेच किती वयस्कर आणि लहानमुलांचा शोध मुंबई पोलिसांनी घेतला याबाबत माहिती आरटीआय ऍक्टखाली मागितली होती. या माहितीया संदर्भात बृहन्मुंबई पोलीस गुन्हे शाखेचे शासकीय माहिती अधिकारी तथा सहाय्यक पोलीस आयुक्त (प्रतिबंधक) यांनी शकील अहमद शेख यांना माहिती दिलेली आहे. वर्ष 2018 मध्ये एकूण 1041 मुलांचे अपहरण झालेले आहे. त्यात आतापर्यंत 792 मुले मिळाली आहेत. तरी अजूनही 249 मुलांचा पत्ता लागलेला नाही. तसेच वर्ष 2018 मध्ये एकूण 2000 मुलींचे अपहरण झालेले आहे. त्यात आतापर्यंत 1422 मुली पोलिसांना सापडल्या आहेत. तर अजून 578 मुली मिळालेल्या नाही. तसेच वर्ष 2018 साली एकूण 6463 पुरुष हरवले आहे. त्यात आतापर्यंत 3995 पुरुष मिळाले आहेत. तर अजून 2468 पुरुषांचा शोध लागलेला नाही. तसेच वर्ष 2018 मध्ये एकूण 7043 स्त्रिया हरवल्या आहेत. त्यात आतापर्यंत 4264 स्त्रिया मिळाल्या आहेत. तर इतर 2779 स्त्रिया मिळाल्या नाहीत म्हणजे अजूनही 828 मुले मिळालेली नाहीत. तसेच अजूनही 5247 व्यक्ती सापडलेल्या नाहीत. ही बाबा अतिशय गंभीर असल्याचं आरटीआय कार्यकर्ता शकील अहमद शेख यांनी सांगितले.