आयफोनच्या क्रेझसाठी किडनी वगैरे ठीक आहे, पण मित्राचे दोन तुकडे करणे...; जुन्या फोनसाठी किती ती क्रूरता
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 2, 2025 16:46 IST2025-04-02T16:45:41+5:302025-04-02T16:46:13+5:30
एका अल्पवयीन तरुणाने मित्राचा आयफोन ११ मिळविण्यासाठी मित्राची हत्या केली आहे.

आयफोनच्या क्रेझसाठी किडनी वगैरे ठीक आहे, पण मित्राचे दोन तुकडे करणे...; जुन्या फोनसाठी किती ती क्रूरता
आयफोनची क्रेझ आणि त्यासाठी किडनी वगैरे विकणारे आपण बरेच पाहिले आहेत. किडनी विकणे वगैरे पर्यंत ठीक आहे. पण एखाद्याचे तुकडे करणे ही किती भीषण आहे, ते पण पाच-सहा वर्षे जुन्या आयफोनसाठी. एका अल्पवयीन तरुणाने मित्राचा आयफोन ११ मिळविण्यासाठी मित्राची हत्या केली आहे.
नवजोत नावाच्या मुलाकडे आयफोन ११ होता. त्याचा २४ मार्चला वाढदिवस होता. तो कुटुंबासोबत साजरा करून मित्रांसोबत हरिद्वारला जातो असे सांगून निघाला होता. परंतू तो तिकडे गेलाच नाही, दुसऱ्या दिवशी त्याचा वडिलांना फोन आला की हरिद्वारला जात नसून घरी परत येत आहे. परंतू नवजोत परत घरी देखील आला नाही.
रात्री पोलिसांना रेल्वे स्टेशनवर एक मृतदेह सापडल्याची माहिती मिळाली. शरीराचे दोन भाग झाले होते. शरीराचे पोटापासून दोन तुकडे झाले होते. छातीवर अनेक जखमा होत्या. मृतदेहाची ओळख पटू शकली नाही. या अज्ञात मृतदेहाची ओळख पटविण्यासाठी गावात सर्वत्र पोस्टर लावले गेले. कोणी आले नाही. घरी परत येतो म्हणणारा मुलगा परत आला नाही म्हणून ३० मार्च रोजी हरजिंदर सिंग त्यांच्या मुलाच्या शोधात पोलिसांकडे पोहोचले.
अमनजोत नावाच्या त्याच्या मित्राने नवजोतची हत्या केल्याचे पोलीस तपासात समोर आले. त्याच्याकडून नवजोतचा आयफोन ताब्यात घेण्यात आला. त्याला आयफोन हवा होता म्हणून त्याने नवजोतचा खून केला होता. नवजोतचा खून करून त्याने मृतदेह टाकण्यासाठी आणखी एका अल्पवयीन मुलाला धमक्या देत मदत घेतली होती. तसेच त्याला १००० रुपये दिले होते. अमनजोतला अल्पवयींनांसाठीच्या कोर्टासमोर हजर करण्यात आले आहे. पुढील तपास सुरु आहे.