चिमुकल्याच्या हत्येचा झाला उलगडा, अल्पवयीन मुलीने दिली गुन्ह्याची कबुली

By ऑनलाइन लोकमत | Published: October 14, 2020 07:03 PM2020-10-14T19:03:31+5:302020-10-14T19:05:36+5:30

Murder : सप्टेंबरमधील गुन्ह्याची आता झाली उकल 

kid's murder revealed, minor girl confessed to the crime | चिमुकल्याच्या हत्येचा झाला उलगडा, अल्पवयीन मुलीने दिली गुन्ह्याची कबुली

चिमुकल्याच्या हत्येचा झाला उलगडा, अल्पवयीन मुलीने दिली गुन्ह्याची कबुली

Next
ठळक मुद्देघणसोली गाव येथे राहणाऱ्या ओमकार साठे (०४) याच्या हत्येची घटना १८ सप्टेंबरला घडली होती. ज्या घरात हि गोणी सापडली होती, घटनेवेळी त्या घरात १७ वर्षाची मुलगी एकटीच होती.

नवी मुंबई : घणसोली येथे चार वर्षीय मुलाच्या हत्येची घटना घडली होती. याप्रकरणी पोलिसांनी शेजारीच राहणाऱ्या अल्पवयीन मुलीला ताब्यात घेऊन बालसुधार गृहात रवानगी केली आहे. अनपेक्षितपणे हातून ही घटना घडल्याचे तिने पोलिसांना सांगितले आहे.

घणसोली गाव येथे राहणाऱ्या ओमकार साठे (०४) याच्या हत्येची घटना १८ सप्टेंबरला घडली होती. तो घराबाहेर खेळत असताना अचानक बेपत्ता झाला होता. काही तास शोधाशोध केल्यानंतर घराच्या मागेच गोणीत त्याचा मृतदेह आढळला होता. याप्रकरणी रबाळे पोलिस ठाण्यात अज्ञात व्यक्तीविरोधात करण्यात आला होता. तर गुन्ह्याची उकल करण्यासाठी रबाळे पोलिसांनी कंबर कसली होती. दरम्यान ओमकार ला ज्या गोणीत गुंडाळले हा होते, त्या गोणीवरून पोलिसांनी तपास सुरु केला होता. यावेळी तशाच प्रकारची गोणी ओमकार राहत असलेल्या इमारतीमध्येच एका घरात आढळून आली होती. त्यानुसार पोलीस निरीक्षक गिरीधर गोरे, उमेश गवळी यांनी तपासाची दिशा ठरवली होती.

ज्या घरात हि गोणी सापडली होती, घटनेवेळी त्या घरात १७ वर्षाची मुलगी एकटीच होती. परंतु पोलिसांनी विश्वासात घेऊन देखील ती तपासात सहकार्य करत नव्हती. अखेर पोलीस निरीक्षक गोरे यांनी सातत्याने त्या मुलीकडे चौकशी करून तिला विश्वासात घेतले असता, २३ दिवसांनी तिने गुन्ह्याची कबुली दिली. मात्र ओमकार सोबत तिच्य घरात नेमके घडले काय यावरच पडदा तिने उलघडलेला नाही. ओमकार हा नेहमी तिच्या घरी खेळायला जात असे. घटनेच्या दिवशी पण तो तिच्या घरी असताना अचानक बेशुद्ध पडला. यामुळे भयभीत झालेल्या या मुलीने त्याला गोणीत बांधून घराच्या मागच्या बाजूच्या खिडकीतून खाली फेकले. यामध्येच त्याचा गुदमरून मृत्यू झाला होता. मात्र तो बेशुद्ध कशाने झाला याचा उलगडा होऊ शकलेला नाही. तर तिने गुन्ह्याची कबुली देताच मंगळवारी तिला ताब्यात घेऊन बालसुधार गृहात पाठवण्यात आले आहे.

Web Title: kid's murder revealed, minor girl confessed to the crime

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.