चिमुकल्याचा गेला नाहक बळी, बर्थडे पार्टीत डान्स सुरु असताना झाला गोळीबार
By ऑनलाइन लोकमत | Published: April 3, 2022 09:50 PM2022-04-03T21:50:54+5:302022-04-03T21:51:27+5:30
Firing Case : पोलिसांनी तीन जणांविरुद्ध सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करून दोघांना अटक केली.
बिजनौर - वाढदिवसाच्या पार्टीत डीजेवर डान्स सुरू असताना दोन गटांत गोळीबार झाला. गोळी लागल्याने चौथीत शिकणाऱ्या विद्यार्थ्याचा मृत्यू झाला. पोलिसांनी तीन जणांविरुद्ध सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करून दोघांना अटक केली.
हे प्रकरण काय आहे?
शहरातील चाशिरी बी-24 येथील रहिवासी असलेल्या अरमानचा मुलगा इकराम याचा शुक्रवारी रात्री वाढदिवस होता. कार्यक्रमात अतिक रा. लाडापुरा गाव शहर कोतवाली आणि अरमानचा भाऊ इम्रान हेही आले होते. रात्री उशिरा डीजेवर डान्स सुरू असताना चशिरी येथील बसी उर्फ पिद्दी याने इम्रानच्या पायाला मार लागला. इम्रान आणि बसी यांनी एकमेकांना घाबरवण्यासाठी हवेत गोळीबार केला. यादरम्यान टेरेसवर डान्स पाहत उभा असलेल्या 10 वर्षीय जुनैद मुलगा जुम्मा रा.हिमपूरदीपा याला गोळी लागली. रुग्णालयात त्याचा मृत्यू झाला. जुनैद त्याचे मामा इझहर अहमद यांच्या घरी आला होता. मुबारकपूर काला पोलिस ठाण्यातील हद्दीत ही दुःखद घटना घडली. सीओ सिटी कुलदीप गुप्ता आणि सिटी कोतवाल राधेश्याम घटनास्थळी पोहोचले आणि मृतदेह पोस्टमार्टमसाठी पाठवला. पोलिसांनी मुलाच्या वडिलांच्या तक्रारीवरून बसी उर्फ पिड्डी, इम्रान आणि आकिब यांच्या विरोधात सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल केला. पोलिसांनी इम्रान आणि बसीला अटक केली. इम्रान हा अरमानचा मोठा भाऊ आहे. इम्रानच्या पिस्तुलातून गोळी झाडण्यात आली असून ती गोळी मुलाच्या डोक्याच्या उजव्या बाजूला लागल्याचे पोलिस तपासात उघड झाले आहे. पोलिसांना प्रत्येकी एक पिस्तूल सापडले आहे.
जुनैद हा चौथ्या वर्गाचा विद्यार्थी होता
जुनैद हा त्याच्या गावातील प्राथमिक शाळेत चौथीत शिकत होता. त्याच्या मृत्यूमुळे नातेवाइकांवर दुःखाच्या डोंगर कोसळला आहे. जुनैदला तीन भाऊ आणि एक बहीण आहे.