धक्कादायक! विम्याच्या पैशासाठी जवळच्या मित्राची हत्या, १ कोटी रकमेसाठी स्वत:च्या मृत्यूचा केला बनाव
By ऑनलाइन लोकमत | Published: January 3, 2024 08:58 AM2024-01-03T08:58:42+5:302024-01-03T08:59:04+5:30
विम्याच्या रकमेसाठी एका व्यक्तीने स्वत:चा मृत्यूचा बनाव केल्याचे उघड झाले आहे.
तमिळनाडू येथील चेन्नईतून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. एका व्यक्तीने विम्याची रकमेसाठी आपल्या जवळच्या मित्राची हत्या केल्याचे समोर आले आहे. एका व्यक्तीने १ कोटी रुपयांच्या विमा पेआउटचा दावा करण्यासाठी त्याच्या मृत्यूचा बनाव केला. तो मित्र आपल्या सारखा दिसतो म्हणून त्याने हत्या केली. याप्रकरणी आरोपी आणि त्याच्या दोन मित्रांना अटक करण्यात आली आहे.
पोलिसांनी दिलेली माहिती अशी, अयनावरम येथील रहिवासी सुरेश हरिकृष्णन यांनी जीवन विमा पॉलिसीमध्ये १ कोटी रुपयांचा दावा करण्यासाठी आपल्या मृत्यूचा बनाव केला होता. मग तो, त्याच्या दोन मित्रांसह, तो शारीरिकदृष्ट्या समान वयाच्या व्यक्तीचा शोध घेऊ लागला.
अपघातानंतर पळून जाणे बेततेय जीवावर, ‘हिट अँड रन’मुळे देशभरात सर्वाधिक मृत्यू
तिघांनी दिलीबाबू नावाच्या व्यक्तीचा शोध घेतला. आरोपी सुरेश दहा वर्षांपूर्वी दिलीबाबूला ओळखत होता. तोही अयनावरमचा रहिवासी होता. त्यानंतर सुरेशने दिलीबाबू आणि त्यांच्या आईशी मैत्री केली आणि त्यांना नियमित भेटू लागला. १३ सप्टेंबरला हे तिघे दिलीबाबूला दारू पाजण्यासाठी पुद्दुचेरीला घेऊन गेले.
पोलिसांनी सांगितले की, त्यांनी दिलीबाबूला चेंगलपट्टूजवळील एका मोकळ्या भूखंडावर नेले जेथे त्याने आधीच एका शेतात झोपडी बांधली होती, १५ सप्टेंबरच्या रात्री सुरेशने दारूच्या नशेत दिलीबाबूचा गळा आवळून झोपडी पेटवून दिल्याचे सांगण्यात येत आहे. यानंतर तो घटनास्थळावरून पळून गेला. सुरेश फरार झाल्यावर त्याचा आगीत मृत्यू झाला असे गृहीत धरून त्याच्यावर अंत्यसंस्कार केले.
दरम्यान, दिल्लीबाबूंची आई लीलावती यांनी मुलगा हरवल्याची तक्रार दाखल केली होती. कोणतीही कारवाई न झाल्याने त्यांनी मद्रास उच्च न्यायालयात धाव घेतली. १६ सप्टेंबर रोजी एका जळालेल्या झोपडीत जळालेला मृतदेह असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. चौकशी केली असता त्या व्यक्तीचे नाव सुरेश असल्याचे निष्पन्न झाले. त्याचा मृतदेह त्याच्या बहिणीने नेला आणि अंतिम संस्कार करण्यात आल्याचे त्याला सांगण्यात आले.
लीलावती यांनी पोलिसांना कळवले होते की, मुलगा बेपत्ता झाला त्यादिवशी ती सुरेशसोबत बाहेर गेला होता आणि सप्टेंबरमध्ये तिचे मुलाशी शेवटचे बोलणे झाले होते. यावर कारवाई करत पोलीस सुरेशच्या गावी गेले, तिथे तो मृत झाल्याचे त्याच्या नातेवाईकांनी सांगितले.
दिलीबाबूच्या मृत्यूला सप्टेंबरमध्ये मृत गृहीत धरलेला सुरेश जबाबदार असल्याचे पोलिसांना आढळून आले. पोलिसांनी दोघांचे मोबाईल ट्रेस केले आणि त्यांच्या फोनचे सिग्नल जळालेल्या झोपडीजवळ सक्रिय असल्याचे आढळले. त्यांनी त्याच्या काही मित्रांचा शोध घेतला असता त्यांना सुरेश जिवंत असल्याचे आढळले. चौकशी केली असता सुरेश आणि कीर्ती राजन यांनी दिलीबाबूच्या हत्येची कबुली दिली. पोलिसांनी आरोपींना अटक करून सोमवारी न्यायालयीन कोठडी सुनावली.