नवऱ्याचा काटा काढला अन् बेडवर साप ठेवला, कारण...; बायकोचा विषारी प्लॅन, असा झाला पर्दाफाश

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 17, 2025 12:30 IST2025-04-17T12:29:05+5:302025-04-17T12:30:44+5:30

पतीची हत्या केल्यानंतर पत्नीने स्वतःला वाचवण्यासाठी मुस्कान आणि साहिलसारखा भयानक कट रचला. मात्र यावेळी निळ्या ड्रमऐवजी, एका सर्पमित्राकडून साप विकत घेण्यात आला.

killed husband amit with help of lover snakes bit him 10 times secret of wife ravita of meerut | नवऱ्याचा काटा काढला अन् बेडवर साप ठेवला, कारण...; बायकोचा विषारी प्लॅन, असा झाला पर्दाफाश

नवऱ्याचा काटा काढला अन् बेडवर साप ठेवला, कारण...; बायकोचा विषारी प्लॅन, असा झाला पर्दाफाश

मेरठमध्ये एक धक्कादायक घटना समोर आली आहे. पतीची हत्या केल्यानंतर पत्नीने स्वतःला वाचवण्यासाठी मुस्कान आणि साहिलसारखा भयानक कट रचला. मात्र यावेळी निळ्या ड्रमऐवजी, एका सर्पमित्राकडून साप विकत घेण्यात आला. पतीची हत्या केल्यानंतर पत्नी रविता हिने नवऱ्याच्या बेडवर साप सोडला. नंतर असा दावा करण्यात आला की, तरुण झोपेत असताना त्याला १० वेळा साप चावला आणि त्याचा मृत्यू झाला. पण पोस्टमॉर्टेम रिपोर्टमध्ये सत्य बाहेर आले.

अमित मेरठच्या बहसुमा पोलीस स्टेशन परिसरातील अकबरपूर सादात गावचा रहिवासी होता. तो बेडवर झोपला आणि सकाळी त्याचा मृतदेह आढळला, त्यासोबत बेडवर एक जिवंत सापही दिसला. लोकांना वाटलं की, अमितला साप चावला त्यामुळे त्याचा मृत्यू झाला. गावात एकच खळबळ उडाली. याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला, ज्यामध्ये बेडवर एक साप बसलेला स्पष्ट दिसत आहे. 

सुनियोजित हत्या असल्याचं उघड

जेव्हा अमितचा पोस्टमॉर्टेम रिपोर्ट आला तेव्हा त्यातून अतिशय धक्कादायक गोष्ट समोर आली. डॉक्टरांनी स्पष्टपणे सांगितलं की, अमितचा मृत्यू साप चावल्याने झाला नव्हता तर गळा दाबल्याने झाला होता. हे ऐकून पोलीस सावध झाले. तपास लगेच सुरू झाला. ही एक सुनियोजित हत्या असल्याचं उघड झालं. पोलिसांनी तपास केला तेव्हा संशयाची सुई थेट अमितची पत्नी रविता हिच्याकडे गेली.

पत्नीचं दुसऱ्या तरुणावर प्रेम, नात्यात अडथळा ठरत होता पती

पोलिसांनी रविताची कसून चौकशी सुरू केली. तसेच गावातील आणखी दोन तरुणांनाही ताब्यात घेण्यात आले. तपासादरम्यान ज्या गोष्टी समोर आल्या त्या एखाद्या चित्रपटाच्या कथेपेक्षा कमी नव्हत्या. रविताचे तिच्याच गावातील एका तरुणाशी अवैध संबंध होते. दोघांमध्ये प्रेमसंबंध सुरू होते आणि अमित या नात्यात अडथळा बनला होता. म्हणून रविता आणि तिच्या प्रियकराने मिळून अमितला संपवण्याचा कट रचला.

पोस्टमॉर्टेम रिपोर्टने पत्नीचा पर्दाफाश

हत्या केल्याचं समजायला नको म्हणून रविता आणि तिच्या प्रियकराने बाजारातून एक जिवंत साप विकत घेतला आणि त्याच्या मृतदेहाखाली तो साप ठेवण्यात आला जेणेकरून असं दिसून येईल की त्याचा मृत्यू साप चावल्याने झाला आहे. एवढंच नाही तर ही घटना खरी असल्याचं दाखवण्यासाठी व्हिडीओ बनवण्यात आले आणि सोशल मीडियावर व्हायरलही करण्यात आले. पण पोस्टमॉर्टेम रिपोर्टने पत्नीचा पर्दाफाश केला. पोलिसांनी रविता आणि तिच्या प्रियकराला अटक केली. चौकशीदरम्यान दोघांनीही आपला गुन्हा कबूल केला आहे.
 

Web Title: killed husband amit with help of lover snakes bit him 10 times secret of wife ravita of meerut

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.