पुण्यातील सिंहगड रस्त्यावरुन पोलिसाचे अपहरण करुन जीवे मारण्याची धमकी
By ऑनलाइन लोकमत | Published: July 15, 2019 04:18 PM2019-07-15T16:18:37+5:302019-07-15T16:20:41+5:30
नंबर प्लेट नसलेल्या कारला अडवून ती अभिरुची पोलीस चौकीस घेण्यास सांगितले असता तिघा तरुणांनी पोलिसांचे अपहरण करुन त्यांना मारहाण करुन जीवे मारण्याची धमकी दिली़..
पुणे : नंबर प्लेट नसलेल्या कारला अडवून ती अभिरुची पोलीस चौकीस घेण्यास सांगितले असता तिघा तरुणांनी पोलिसांचेअपहरण करुन त्यांना मारहाण करुन जीवे मारण्याची धमकी दिली़. त्यानंतर त्यांना बावधन येथे सोडून ते पळून गेले़ याप्रकरणी सिंहगड रोड पोलिसांनी सचिन रानवडे, मयुर मते आणि त्यांचा एक साथीदार अशा तिघांवर गुन्हा दाखल केला आहे़.ही घटना रविवारी रात्री पावणेनऊ वाजता सिंहगड रोडवरील सुमा हॉटेल ते बावधन दरम्यान घडला़.
याप्रकरणी पोलीस नाईक सचिन तनपुरे यांनी फिर्याद दिली आहे़. याबाबत पोलिसांनी सांगितले की, सचिन तनपुरे हे सहकाऱ्यांसह अभिरुची पोलीस चौकीत मार्शल म्हणून कार्यरत होते़. तेव्हा हॉटेल सुमाजवळ सचिन रानवडे हा त्यांचे मित्रासह रस्त्यावर दारू पिताना मिळून आला़. त्याच्या गाडीस पाठीमागे नंबर प्लेट नव्हती़. तेव्हा त्यांनी रस्त्यावर दारु का पिता असे विचारल्यावर रानवडे याने त्यांना शिवीगाळ करुन पोलीस नाईक शिंदे यांना धक्काबुक्की केली़. त्यानंतर त्यांनी समजावून सांगून गाडी अभिरुचीला घेण्यास सांगितले व ते गाडीत पाठीमागे बसले़. त्यांनी गाडी अभिरुची चौकीला न घेता प्रयेजा सिटीमार्गे पुणे मुंबई महामागार्ने घेऊन गाडीत तनपुरे यांना शिवीगाळ केली़. यावेळी शिंदे हे त्यांच्या गाडीचा पाठलाग करत होते़. ते पाहून रानवडे याने गाडीत हाताने मारहाण केली व पुलावरुन खाली टाकून जीवे मारण्याची धमकी दिली़. त्यांच्याकडील मोबाईल व वॉकी टॉकी काढून घेऊन मयुर मते याने सचिन रानवडे याच्या मोबाईलमध्ये शुटींग करुन व्हिडिओ तयार केला़ जीवे मारण्याची धमकी देऊन तनपुरे यांना जबरदस्तीने बावधन येथे घेऊन गेले़. या घटनेची माहिती मिळताच सिंहगड पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली़. त्यांच्यातील एकाला ताब्यात घेतले असून दोघे जण पळून गेले़ पोलीस उपनिरीक्षक शिवदास गायकवाड अधिक तपास करीत आहेत़.