मद्यधुंद अवस्थेत गाडी चालवत घेतला बळी

By ऑनलाइन लोकमत | Published: March 1, 2023 10:01 AM2023-03-01T10:01:23+5:302023-03-01T10:01:32+5:30

मध्यरात्रीची घटना; कार चालक अटकेत

Killed while driving under the influence of alcohol | मद्यधुंद अवस्थेत गाडी चालवत घेतला बळी

मद्यधुंद अवस्थेत गाडी चालवत घेतला बळी

googlenewsNext

लोकमत न्यूज नेटवर्क
उल्हासनगर : शहरातील कल्याण ते बदलापूर रस्त्यावर सोमवारी रात्री १ च्या दरम्यान भरधाव कारच्या धडकेत अफशर शेख यांचा जागीच मृत्यू झाला. याप्रकरणी मद्यधुंद अवस्थेत कार चालविणाऱ्या हरेश मुलचंदानी याला मध्यवर्ती पोलिसांनी अटक केली असून पोलिस तपास करीत आहेत. 

उल्हासनगरातून जाणारा कल्याण ते बदलापूर रस्ता भरधाव वाहनांमुळे अपघात रस्ता म्हणून ओळखला जात आहे. सोमवारी रात्री १ वाजण्याच्या दरम्यान फर्स्ट गेट येथे एक भरधाव कार अफशर शेख याला जोरदार धडक देऊन झाडावर आढळली. अपघातानंतर कारमध्ये असलेल्या मद्यधुंद अवस्थेतील काही जणांनी तेथून पळ काढला, तर जखमी झालेल्या अफशर शेख याला उपचारासाठी मध्यवर्ती पोलिस ठाण्यात नेण्यात आले. मात्र डॉक्टरांनी शेख याला तपासून मृत घोषित केले. मध्यवर्ती पोलिसांनी जलद तपास करून काही तासांत कार चालक हरेश मुलचंदानी याला ताब्यात घेतले. याप्रकरणी मध्यवर्ती पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला असून पोलिस अधिक तपास करीत आहेत.

Web Title: Killed while driving under the influence of alcohol

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Accidentअपघात