जेवणाची भांडी धुतली नसल्यावरून बोलल्याने सहकाऱ्याची केली हत्या

By ऑनलाइन लोकमत | Published: September 24, 2019 09:41 PM2019-09-24T21:41:29+5:302019-09-24T21:41:55+5:30

भाईंदरच्या चौक समुद्रात मासेमारी बोटीवरील घटना

Killing a colleague for talking about not washing the dishes | जेवणाची भांडी धुतली नसल्यावरून बोलल्याने सहकाऱ्याची केली हत्या

जेवणाची भांडी धुतली नसल्यावरून बोलल्याने सहकाऱ्याची केली हत्या

Next

मीरारोड - भाईंदरच्या चौक जवळील समुद्रात मासेमारी बोटीवर जेवणाची भांडी धुण्यास सांगितल्याने एका खलाशाने सहकारी खलाशाच्या डोक्यात मासेमारी जाळे ओढण्याचा रॉड मारुन समुद्रात फेकून दिल्याची घटना घडली आहे. या प्रकरणी उत्तन पोलिसांनी सोमवारी गुन्हा दाखल करून आरोपीस अटक केली आहे.

लेन्सन कतवार यांनी प्रलयकर ही मासेमारी बोट भाड्याने घेतली असून त्या बोटीवर संतु राम हरीराम (३४), तुनियाराम गोविंदराम (३२),
गिरीवर वसुदेव (४६), रामास्वामी भुवनेश्वर श्रीवास (२८) हे खलाशी काम करतात. यातील रामास्वामी हा बोटीवरची कामे करत नसल्याने त्याला संतु बोलायचा. त्यावरुन दोघांमध्ये वाद व्हायचे.

सदर बोट चौक धक्का पासुन लांब समुद्रात असताना २१ सप्टेंबर रोजी रात्री ११च्या सुमारास बोटीवर जेवण केले. संतुने जेवणाची भांडी रामास्वामीला धुण्याास सांगीतली असता त्याने नकार दिला. संतुने बडबड केली असता रामास्वामीने त्याला ओढत बोटीच्या केबिन जवळ नेले. तेथे मासेमारी जाळे ओढण्यासाठी असलेल्या लोखंडी रॉडने संतुच्या डोक्यावर प्राणघातक प्रहार केला. तुनियाराम व गिरीवर वाचवण्यास गेले असता दोघांना मारण्याची धमकी दिल्याने ते पुढे गेले नाहीत. रामास्वामीने रक्तबंबाळ संतुला बोटीवरुन समुद्रात फेकुन दिले.

संतु बेपत्ता झाल्यानंतर त्याचा मृतदेह चौक धक्का जवळ पाण्यात तरंगताना आढळून आला. या प्रकरणी पोलिसांनी बोटीची पाहणी केली असता त्यावर रक्ताचे डाग आढळून आले. संतुची हत्या बोटीतच झाल्याची खात्री पटल्यावर पोलिसांनी तुनियाराम व गिरीवरकडे चौकशी केली असता त्यांनी घडला प्रकार सांगितला. पोलिसांनी आरोपी रामास्वामीला अटक केली असून त्याने हत्येची कबुली दिल्याचे उपनिरीक्षक सुरज शिंदे यांनी दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे.
 

Web Title: Killing a colleague for talking about not washing the dishes

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.