पत्नीला ठार करून लहान मुलाचाही खून; दुहेरी हत्याकांडाने बीड जिल्हा हादरला

By ऑनलाइन लोकमत | Published: October 12, 2022 05:47 AM2022-10-12T05:47:59+5:302022-10-12T05:48:12+5:30

पत्नीला मारताना मुलाने पाहिल्याने त्याच्या गळ्यावर कुऱ्हाडीने वार करत त्याला जागीच ठार केले.

Killing the wife and also killing the child; Beed district was shaken by the double murder | पत्नीला ठार करून लहान मुलाचाही खून; दुहेरी हत्याकांडाने बीड जिल्हा हादरला

पत्नीला ठार करून लहान मुलाचाही खून; दुहेरी हत्याकांडाने बीड जिल्हा हादरला

googlenewsNext

लोकमत न्यूज नेटवर्क  
माजलगाव (जि. बीड) : तालुक्यातील मंजरथ येथील काळे वस्तीवर राहणाऱ्या एका व्यक्तीने पत्नीच्या गळ्यावर कुऱ्हाडीने वार केले. यावेळी जागे झालेल्या सहा वर्षांच्या मुलाने हा प्रकार बघितल्याने, त्याच्याही मानेवर  कुऱ्हाडीने वार करत हत्या केली. सोमवारी रात्री उशिरा ही घटना घडली.  

पांडुरंग शिवाजी दोडतले असे आरोपीचे नाव असून पहाटे तीनच्या सुमारास त्याने  पत्नी लक्ष्मीच्या गळ्यावर ती झोपेत असताना कुऱ्हाडीचे घाव घातले. यावेळी लक्ष्मी ओरडली. तिच्या ओरडण्याचा आवाज ऐकून  सहा वर्षांचा मुलगा पिल्या दोडतले हा जागा झाला. पत्नीला मारताना मुलाने पाहिल्याने त्याच्या गळ्यावर कुऱ्हाडीने वार करत त्याला जागीच ठार केले. यानंतर, स्वतःही गळफास घेऊन आत्महत्या करत असताना, त्याच्या गळ्यातील दोर तुटल्याने तो यात वाचला. 

 यावेळी आरडाओरड झाल्याने आजूबाजूचे लोक जागे झाले.  त्यांनी  हा प्रकार पाहिल्यानंतर पोलिसांना पाचारण करण्यात आले. त्यानंतर, ग्रामीण पोलिसांनी घटनास्थळी जाऊन आरोपीला ताब्यात घेतले. पांडुरंग दोडतले याच्या विरोधात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Web Title: Killing the wife and also killing the child; Beed district was shaken by the double murder

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.