शिक्षक मतदार संघाचे उमेदवार किरण सरनाईकांवर मारेगावात गुन्हा दाखल
By ऑनलाइन लोकमत | Published: November 24, 2020 05:39 PM2020-11-24T17:39:18+5:302020-11-24T17:40:01+5:30
Crime News : आचार संहिता भंग प्रकरण : शिक्षक वर्गात खळबळ
मारेगाव (यवतमाळ) - अमरावती विधानपरिषद निवडणुकीत आचार संहिता भंग केल्याप्रकरणी अमरावती,शिक्षक मतदार संघाचे उमेदवार किरण सरनाईक (45)रा.वाशिम यांचेवर मारेगाव पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
अमरावती शिक्षक मतदार संघाची निवडणूक रनधुमाळी सुरु आहे. शिक्षक मतदार संघाचे उमेदवार किरण सरनाईक यांनी आचार संहितेचे उल्लंघन करून पैठणी साड्या व पैशे वाटप केले अशा आशयाची तक्रार प्रवीण वानखडे यांनी दिनांक 23 नोव्हेंबर रोजी मा.विभागीय आयुक्त यांचेकडे केली. या दरम्यान साड्या व पैसे वाटप केल्याचे उघडकीस आल्याने तालुका आचार संहिता पथक प्रमुख तथा प.स.चे विस्तार अधिकारी संदीप वाघमारे (32) यांचे तक्रारी नुसार मारेगाव पोलीस स्टेशन चे पो.नि.जगदीश मंडलवार यांनी उमेदवार किरण सरनाईक यांचे विरोधात तालुक्यातील शिक्षकांना पैठणी साड्या व पैसे वाटून आचार संहितेचे उल्लंघन केल्या।प्रकरणी.क्र. कलम 297/19 कलम 188,171(ई) भादवी सह कलम 123 (1)क (ख) लोकप्रतिनिधी अधिनियम 1951 अंनव्ये गुन्हा दाखल करण्यात आला. पुढील तपास उप. वि.पो.अधिकारी संजय पुजलवार यांचे मार्गदर्शनात पो.नि.जगदीश मंडलवार करत आहे.