आधी चुंबन दे, मग नाव सांगेन... मेव्हणीकडून फोनवर मागितला KISS, भावोजीविरुद्ध केला FIR दाखल

By ऑनलाइन लोकमत | Published: July 8, 2022 06:31 PM2022-07-08T18:31:07+5:302022-07-08T18:32:23+5:30

FIR against Sister's Husband :बहिणीच्या नवऱ्याच्या या कृत्यावरून मेहुणीने पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला.

KISS asked wife's sister over phone, filed FIR against Jija | आधी चुंबन दे, मग नाव सांगेन... मेव्हणीकडून फोनवर मागितला KISS, भावोजीविरुद्ध केला FIR दाखल

आधी चुंबन दे, मग नाव सांगेन... मेव्हणीकडून फोनवर मागितला KISS, भावोजीविरुद्ध केला FIR दाखल

googlenewsNext

उत्तर प्रदेशातील महाराजगंज जिल्ह्यातील कोतवाली पोलीस ठाण्याच्या हद्दीतील एका गावात मेहुणीकडून फोनवर चुंबन मागणे महागात पडले. बहिणीच्या नवऱ्याच्या या कृत्यावरून मेहुणीने पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला. जिल्हाधिकारी कार्यालय पोलीस चौकीच्या महिला प्रभारी या प्रकरणाचा तपास करत आहेत.

पीडितेचे म्हणणे आहे की, तिने सर्वप्रथम या घटनेची माहिती तिच्या बहिणीला दिली. त्यानंतर आपल्या या कृत्याबद्दल काकांना सांगितले. यामुळे तो संतप्त झाला आणि तुला पाहून घेईन अशी धमकी देऊ लागला. यानंतर महिलेने पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. या प्रकरणाची गंभीर दखल घेत पोलिसांनी आरोपी तरुणाविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

महिलेने पोलिसांना दिलेल्या तक्रारीत सांगितले की, तिला एका अनोळखी नंबरवरून फोन आला. त्याने नाव आणि फोन करण्याचे कारण विचारले असता. आधी चुंबन दे, मग नाव सांगेन, असे या तरुणाने सांगितले. तरुणाला धमकावत महिलेने फोन ठेवून दिला. यानंतर तरुणाने अनेकवेळा फोन केला आणि प्रत्येक वेळी तो अश्लील बोलू लागला.काही वेळाने महिलेच्या नंणदेच्या मोबाईलवर फोन करून तिच्याशी अश्लील बोलला. तपासात तरुणाचे सासरचे लोक या महिलेच्याच गावात असून, तो नात्याने भावोजी असल्याचे समजते. यानंतर ही महिला तिच्या मेव्हणीसह तरुणाच्या सासरी पोहोचली आणि पत्नीशिवाय त्याच्या कुटुंबातील इतर सदस्यांना तरुणाच्या दुष्कर्माची माहिती दिली. आरोपीच्या पत्नीने हे कृत्य उघड केल्याने त्याला राग आला आणि वाद झाला. यावरून पीडितेने पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. पोलीस या प्रकरणाचा तपास करत आहेत.

Web Title: KISS asked wife's sister over phone, filed FIR against Jija

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.