Kiss Day ठरला 'त्या' प्रेमीयुगुलाच्या आयुष्यातला शेवटचा दिवस

By ऑनलाइन लोकमत | Published: February 13, 2020 08:50 PM2020-02-13T20:50:37+5:302020-02-13T20:53:34+5:30

दोघेही चक्रघरपूर येथील झरझरा गावातील रहिवासी आहेत.

Kiss Day is became the last day in the life of a lovers | Kiss Day ठरला 'त्या' प्रेमीयुगुलाच्या आयुष्यातला शेवटचा दिवस

Kiss Day ठरला 'त्या' प्रेमीयुगुलाच्या आयुष्यातला शेवटचा दिवस

Next
ठळक मुद्देया तरुण प्रेमीयुगुलाने एकमेकांना मिठी मारत रेल्वे लोकलखाली येऊन आत्महत्या केल्याची घटना आज घडली. दोघांच्या आधारकार्डवरून ओळख पटली. पुढील तपास सुरू आहे.लखीराम गगराई (22) व रायमुनी हांसदा (20) असे आत्महत्या केलेल्या तरुण आणि तरुणीचं नाव आहे.

चाईबासा (झारखंड) - व्हॅलेंटाईन डेच्या आदल्या दिवशी म्हणजेच Kiss Day ला प्रेमीयुगुल आनंद साजरा करत असताना झारखंडमधील चाईबासा येथे अतिशय धक्कादायक घटना घडली. आज kiss Day च्या दिवस त्या प्रेमीयुगुलासाठी अखेरचा दिवस ठरला. या तरुण प्रेमीयुगुलाने एकमेकांना मिठी मारत रेल्वे लोकलखाली येऊन आत्महत्या केल्याची घटना आज घडली. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे. लखीराम गगराई (22) व रायमुनी हांसदा (20) असे आत्महत्या केलेल्या तरुण आणि तरुणीचं नाव आहे. दोघेही चक्रघरपूर येथील झरझरा गावातील रहिवासी आहेत.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, चक्रधरपूर रेल्वे स्थानकात लोकलखाली येऊन एका प्रेमीयुगलाने आत्महत्या केली. घटनास्थळी गेल्यानंतर दोघांनी एकमेकांना मिठी मारलेली होती. रेल्वे रुळावरून दोन भाग झालेले त्यांचे शव पडले होते. ट्रेन अंगावरून गेल्यामुळे त्यांचे डोके व धड वेगवेगळे झाले होते. दोघांचे मोबाईल ताब्यात घेण्यात आले आहेत. दोघांचे प्रेमसंबंध असल्याची माहिती पुढे आली आहे. दोघांच्या आधारकार्डवरून ओळख पटली. पुढील तपास सुरू आहे.

जीआरपीने दोन्ही मृतदेह ताब्यात घेऊन शवविच्छेदनासाठी चक्रधरपूर रेफरल रुग्णालयात पाठविले. रेल्वे रुळावर त्या दोघांच्याही धड एकमेकांच्या मिठीत असल्याचे आढळून आले. पोलिसांनी अनेक फोटो जप्त केले. दोघेही फोटोत एकत्र होते. मुलीच्या पर्समधून आधार कार्ड आणि एक हजार रुपयेही जप्त केले. दोघांचे मोबाईल पोलिसांनी हस्तगत केले आहेत. मोबाईलद्वारे कुटुंबीयांचा शोध लागला. त्यानंतर जीआरपीने घटनेची माहिती दोन्ही कुटुंबियांना दिली. कुटुंबीयांपर्यंत पोहोचल्यानंतर आत्महत्येची कारण शोधले जाईल. 


जीआरपी ठाण्याचे प्रभारी अधिकारी यू. के. सिंग यांनी सांगितले की, ही घटना पहाटे ५.३० वाजता घडली. त्वरित स्टेशन मास्तरांना सांगितले. घटनास्थळी पोहोचल्यानंतर दोघांनी एकमेकांना मिठी मारलेल्या स्थित मृतदेह आढळले. त्यानंतर मृतदेह ताब्यात घेऊन शवविच्छेदनासाठी पाठविले. घटनेची माहिती कुटुंबियांना देण्यात आली.

Web Title: Kiss Day is became the last day in the life of a lovers

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.