गणेश विसर्जनाला गालबोट, तिघांवर चाकू हल्ला; आरोपीला ताब्यात द्या, गावकरी संतापले
By ऑनलाइन लोकमत | Published: September 18, 2024 09:21 AM2024-09-18T09:21:14+5:302024-09-18T09:21:30+5:30
पोलीस पाटलासह दोन नागरिकांवर चाकू हल्ला, जमावाने पोलिसांची गाडी फोडली
चंद्रपूर- गणेश विसर्जनाला गालबोट लावणारी घटना चंद्रपुर जिल्ह्यात गोंडपिंपरी तालुक्यात सकमुर येथे मंगळवारी रात्री घडली. सकमूर गावातील पोलीस पाटील व इतर दोन नागरिकांवर चाकूने प्राणघातक हल्ला झाल्यामुळे ग्रामस्थ आक्रमक झाले. त्यांनी पोलिसांची गाडी अडवून धरली. आरोपीला आमच्या ताब्यात द्या, अशी मागणी गावकरी करत होते. त्यांची समजूत काढताना पोलिसांची दमछाक झाली. गावकऱ्यांनी पोलिसांच्या वाहनाची हवा सोडली. त्यामुळे पोलिसांना गाडी घेऊन निणे अवघड झाले.
आरोपी इरफान शेख सकमुर जवळ गुजरी या गावात अवैध दारू विक्री करतो. मागील आठ वर्षापासून यांचे कुटुंब येथे वास्तव्यास आहे. यापूर्वीही त्याने अनेकदा लोकांना धमकावल्याचा, मारहाण केल्याचा नागरिकांचा आरोप आहे. इरफान शेखने गणपती मिरवणुकीत शुल्लक कारणावरून नाचताना धक्का लागल्याच्या गोष्टीवरून तुळशीराम काळे पोलीस पाटील, मोहन तांगडे, विभाकर शेरके यांच्यावर सहकाऱ्यांना घेऊन चाकूने हल्ला केल्यामुळे गावकरी संतप्त झाले होते. पोलिसांनी दोन आरोपीना ताब्यात घेतले. पण त्याला आमच्या ताब्यात द्या, अशी मागणी ग्रामस्थ करत होते.
सकमूरवासीयांनी पोलिसांच्या गाडीजवळ गर्दी केली होती. गर्दीला शांत करण्यासाठी घटनास्थळी लाठी, धाबा येथील पोलिसांचा ताफा बोलावण्यात आला. त्यापैकी दोन गाड्यांच्या काचा संतप्त नागरिकांनी फोडल्या. मुख्य आरोपी इरफान शेख याच्यासह अन्य दोन आरोपींना अटक करण्यात आली आहे. इतर त्याच्या साथीदारांचा शोध घेणे सुरू आहे. लाठीचे ठाणेदार सहारे पुढील तपास करीत आहे.
एसडीपीओ यांच्या वाहनाला घेराव
अटक झालेल्या दोन आरोपींना एसडीपीओ राजुरा साखरे हे आपल्या वाहनांमध्ये घेऊन जात असताना नागरिकांनी त्यांना घेराव घातला गर्दीतून वाहन काढताना एका नागरिकाच्या पायावरून चाक गेल्याने त्याचे पाय तुटके गंभीर जखमी झाला
पोलिसांचे वाहन थांबवून मारहाण
दोन आरोपींना गावकऱ्यांनी पोलिसांचे वाहन थांबवून मारहाण केली. त्यांची गंभीर स्थिती आहे व जखमी पोलीस पाटील व गावातील २ नागरिक गंभीर आहे.
एसपी रात्री तीन वाजता घटनास्थळी...
चंद्रपूरचे एसपी सुदर्शन मुम्मका परिस्थिती हाताळण्यासाठी रात्री ३ वाजता घटनास्थळी पोहोचले. सकमुर व गुजरी येथील नागरिकांचा रोष होता की सर्वसामान्यांवरती हल्ला करणाऱ्या आरोपींना आमच्या ताब्यात द्या. शिक्षा आम्ही देऊ या भूमिकेमुळे नागरिकांनी पोलिसांच्या गाडीच्या काचाही फोडल्या परंतु एसपींनी नागरिकांचे समाधान करत कठोर कारवाईचे आश्वासन दिल्यानंतर नागरिकांनी तीन आरोपींना पोलिसांच्या ताब्यात देत पोलिसांच्या वाहनांना वाट मोकळी करून दिली.