महिलांवर अत्याचार नेमके कोण करतेय? किती छळ वाढला? पतीकडून नेमका कधी छळ होतो? जाणून घ्या

By ऑनलाइन लोकमत | Published: September 4, 2022 02:54 PM2022-09-04T14:54:57+5:302022-09-04T14:55:43+5:30

देशात ज्या काही बलात्काराच्या घटना घडतात त्यातील तब्बल ९६ टक्के प्रकरणात नातेवाईक, मित्र, शेजारी आणि अन्य ओळखीच्या लोकांकडून अत्याचार केले जातात. 

know about the Who exactly is oppressing women How much harassment When exactly is harassment from the husband | महिलांवर अत्याचार नेमके कोण करतेय? किती छळ वाढला? पतीकडून नेमका कधी छळ होतो? जाणून घ्या

महिलांवर अत्याचार नेमके कोण करतेय? किती छळ वाढला? पतीकडून नेमका कधी छळ होतो? जाणून घ्या

googlenewsNext

चंद्रकांत दडस, उपसंपादक

नातेवाईक हे प्रत्येक कुटुंबाची एक ताकद असते; मात्र हेच नातेवाईक, जवळचे मित्र आणि ओळखीतले लोक महिलांसाठी शत्रू ठरत आहेत. महिलांना त्यांच्यापासून धोका निर्माण झाला आहे. बलात्कार असो की छळ हा परक्या नव्हे तर आपल्याच लोकांकडून केला जात असेल तर महिलांना यापुढे अधिक सावध पावले टाकत ‘ते’ हात ओळखण्याची गरज आहे. आपल्यावर होत असलेल्या अत्याचाराविरोधात महिलांनी तोंड उघडण्याची गरज निर्माण झाली आहे.

किती छळ वाढला? 
- २०२१ मध्ये देशात तब्बल ४ लाख २८ हजार २७८ महिलांचा छळ अथवा अत्याचार झाल्याच्या घटना घडल्या. २०२० च्या तुलनेत हे प्रमाण १५.३ टक्क्यांनी अधिक आहे. 
- २०२० मध्ये या प्रकरणांमध्ये ३,७१,५०१ गुन्हे दाखल करण्यात आले होते. यातील सर्वाधिक गुन्हे (३१%) हे पती किंवा त्यांच्या नातेवाइकांकडून छळ केल्याची आहेत. महिला अपहरणाच्या १७ टक्के घटना देशात घडल्या आहेत.

शरीरावर ओरखडे -
- देशात ज्या काही बलात्काराच्या घटना घडतात त्यातील तब्बल ९६ टक्के प्रकरणात नातेवाईक, मित्र, शेजारी आणि अन्य ओळखीच्या लोकांकडून अत्याचार केले जातात. 
- देशात बलात्काराच्या सर्वाधिक घटना राजस्थानमध्ये घडत असून, त्यापाठोपाठ मध्य प्रदेश आणि महाराष्ट्रात सर्वाधिक बलात्काराच्या घटना घडतात. 
- यातही १८ ते ३० वर्षांच्या महिलांवर ओरखडे ओढण्याचे प्रमाण सर्वाधिक आहे.

पतीकडून नेमका कधी छळ होतो? -
लग्न झाल्यानंतर नव्या नवरीचे नऊ दिवस अगदी मजेत जातात. सुरुवातीचे काही महिने गेल्यानंतर लगेच छळ करण्यास सुरुवात होते. लग्न झाल्यानंतर २ ते ४ वर्षांच्या काळात हे प्रमाण अधिक वाढते, तर १० वर्षांहून अधिक काळ छळ झालेल्या महिलांचे प्रमाण देशात २६ टक्के अधिक आहे. 

सर्वाधिक छळ कोणत्या राज्यात? -
- महिलांवर भावनिक, शारीरिक किंवा लैंगिक अत्याचार करण्याचे प्रमाण देशात ३१.९ टक्के आहे, तर कर्नाटक राज्यात सर्वाधिक (४८.४ टक्के) छळ केला जातो.
- त्यापाठोपाठ बिहार (४२.५ टक्के), मणिपूर (४१.६ टक्के), तेलंगणा (४०.४ टक्के), उत्तर प्रदेश (३७.३ टक्के) येथे महिलांवर अत्याचाराचे प्रमाण अधिक आहे. 
- महाराष्ट्रामध्ये २८.२ टक्के महिलांचा छळ केला जातो. यातही लैंगिक छळ करणाऱ्या राज्यात कर्नाटक आघाडीवर असून, महाराष्ट्रात महिलांना मारहाणीचे प्रमाण २४.४ टक्के इतके आहे.

महिला तोंड उघडतात? -
ज्या तरुणी अथवा महिलांवर शारीरिक किंवा लैंगिक अत्याचार झाला आहे, त्या याबाबत कुणाकडेच अधिक बोलत नाहीत. त्या या संकटातून बाहेर पडण्यासाठी कुणाचीही मदत न घेता निमूटपणे अत्याचार सहन करतात.

Web Title: know about the Who exactly is oppressing women How much harassment When exactly is harassment from the husband

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.