कोहिनूर मिल आर्थिक व्यवहार प्रकरण : मनसेचे माजी आमदार नितीन सरदेसाई ईडीच्या फेऱ्यात
By ऑनलाइन लोकमत | Published: September 5, 2019 02:20 PM2019-09-05T14:20:18+5:302019-09-05T14:22:45+5:30
नितीन सरदेसाई यांचा सहभाग असल्याची चौकशी वर्तवत ईडीने त्यांना चौकशीसाठी बोलावले आहे.
मुंबई - सध्या मुंबईत गाजत असलेल्या कोहिनूर मिल आर्थिक व्यवहार प्रकरणी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे (मनसे) अध्यक्ष राज ठाकरे यांचे सहकारी आणि मनसे माजी आमदार नितीन सरदेसाई अंमलबजावणी संचालनालय (ईडी) कार्यालयात दाखल झाले आहेत. कोहिनूर मिल आर्थिक व्यवहार प्रकरणी सरदेसाई यांना ईडीने दोन दिवसांपूर्वी नोटीस पाठवून चौकशीसाठी हजर राहण्याचे आदेश दिले होते. या नोटीसनंतर नितीन सरदेसाई आज ईडी कार्यालयात हजर झाले आहे. कोहिनूर मिल आर्थिक व्यवहार प्रकरणामध्ये नितीन सरदेसाई यांचा सहभाग असल्याची चौकशी वर्तवत ईडीने त्यांना चौकशीसाठी बोलावले आहे.
ईडीकडून मनसे अध्यक्ष राज ठाकरे, माजी मुख्यमंत्री मनोहर जोशी याचे चिरंजीव उन्मेष जोशी आणि राजन शिरोडकर यांना नोटीस बजावण्यात आली. त्यानंतर सुरुवातीला अनेक आठ तास उन्मेष जोशी यांची ईडी कार्यालयात चौकशी करण्यात आली. नंतर राज ठाकरे यांचे निकटवर्तीय, बांधकाम व्यावसायिक आणि भागीदार राजन शिरोडकर यांची ईडीने चौकशी केली. तसेच उन्मेष जोशी आणि राजन शिरोडकर यांची एकत्रित चौकशी करण्यात आली. त्याचप्रमाणे मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांची देखील जवळपास नऊ तास चौकशी ईडीने केली.
‘इन्फ्रास्ट्रक्चर लीजिंग अँड फायनान्शियल सर्व्हिसेस’ने (आयएल अँड एफएस) कोहिनूर सीटीएनएल कंपनीत केलेल्या गुंतवणुकीत कंपनीला झालेला तोटा आणि कोहिनूर सीटीएनएल इन्फ्रास्ट्रक्चरने कंपनीचे कर्ज थकवल्याप्रकरणी ईडीद्वारे ही केली जात आहे.दादर येथील कोहिनूर मिल नं. तीन ४२१ कोटींना खरेदी करून तेथे ‘कोहिनूर स्वेअर’ विकसित करण्यासाठी कोहिनूर सीटीएनएल इन्फ्रास्ट्रक्चर ही कंपनी उन्मेष जोशी यांनी स्थापन केली होती. राज, उन्मेष आणि बांधकाम व्यावसायिक राजन शिरोडकर यांनी या कंपनीत गुंतवणूक केली होती. मात्र, कालांतराने राज यांनी या कंपनीतून माघार घेत आपले समभागही विकून टाकले होते. या संपूर्ण व्यवहाराची ईडी चौकशी करत आहे.
मुंबई : नितीन सरदेसाई ईडीच्या कार्यालयात दाखल, कोहिनूर प्रकरणात ईडीकडून सरदेसाईंची चौकशी. https://t.co/CbvSFUjpi9
— Lokmat (@MiLOKMAT) September 5, 2019