कोलकाता केस : "रेपनंतर ती ओरडत होती, म्हणून..."; त्या रात्री लेडी डॉक्टरला कसं मारलं? आरोपी संजयनं स्वतःच सांगितलं!
By ऑनलाइन लोकमत | Published: August 27, 2024 10:37 AM2024-08-27T10:37:48+5:302024-08-27T10:42:16+5:30
मुख्य आरोपी संजय रॉयने (Sanjay Roy) चौकशी दरम्यान आपला गुन्हा कबूल केल्याचे समजते. याच बरोबर त्याने बलात्कारानंतर हत्या का केली? याचे कारणही सांगितले आहे.
कोलकात्यातील आरजी कर मेडिकल कॉलेज आणि हॉस्पिटल मध्ये ट्रेनी महिला डॉक्टरवर झालेला बलात्कार आणि हत्येनंतर संपूर्ण देशभरात संतापाची लाट आहे. या प्रकरणात रोजच्या रोज नवनवे खुलासे होत आहेत. यातच आता मुख्य आरोपी संजय रॉयने (Sanjay Roy) चौकशी दरम्यान आपला गुन्हा कबूल केल्याचे समजते. याच बरोबर त्याने बलात्कारानंतर हत्या का केली? याचे कारणही सांगितले आहे. संबंधित घटना 8-9 ऑगस्टच्या रात्री रुग्णालयाच्या सेमिनार हॉलमध्ये घडली होती.
आरोपीने बलात्कारानंतर का केली लेडी डॉक्टरची हत्या? -
माध्यमांनी सूत्रांच्या हवाल्याने दिलेल्या वृत्तानुसार, आरोपी सजंय रॉयने चौकशीदरम्यान कबूल केले होते की, बलात्कारानंतर सातत्याने ओरडत असल्याने त्याने पीडितेची हत्या केली. ट्रेनी डॉक्टर सातत्याने ओरडत होती. म्हणून संजय रॉयने तिचा गळा दाबला आणि तिचा मृत्यू झाला.
संजय रॉय चांगला बॉक्सर होता, असेही बोलले जात आहे. कदाचित यामुळेच पीडितेला त्याच्या हातून स्वतःचा बचाव करता आला नाही. पीडितेने स्वतःचा बचाव करण्यासाठी आरडाओरडही केली. संजय रॉयने पकडले जाण्याच्या भीतीने तिची संपूर्ण ताकदीने गळा दाबून हत्या केली. संजय रॉयने त्यांच्या मेडिकल दरम्यान याचा खुलासा केला होता. याशिवाय, रविवारी आरोपी संजयची पॉलीग्राफ टेस्टदेखील करण्यात आली होती.
8-9 ऑगस्टच्या रात्री काय घढल? -
कोलकात्यातील आरजी कर मेडिकल कॉलेज आणि रुग्णालयाच्या सेमिनार हॉलमध्ये 8-9 ऑगस्टच्या रात्री ट्रेनी महिला डॉक्टरवर बलात्कार झाला आणि तिची हत्या करण्यात आली. ट्रेनी डॉक्टरचा मृतदेह दुसऱ्या दिवशी सकाली सेमिनार हॉलमध्ये आढळून आला होता. मृतदेह आढळण्याच्या काही तास आधीच ती आपली 36 तासांची शिफ्ट करून आराम करण्यासाठी हॉलमध्ये गेली होती.
तिच्या शवविच्छेदनात 16 बाह्य आणि 9 अंतर्गत जखमा आढळून आल्या. सीसीटीव्ही फुटेजनुसार, संजय रॉय 9 ऑगस्टला पाहाटे 4.03 वाजता रुग्णालयात दाखल झाला होता. 8 ऑगस्टला तो चेस्ट डिपार्टमेंटमध्ये गेला होता आणि कॅमेऱ्यात पीडित डॉक्टर आणि इतरांना टक लावून बघताना दिसून आला होता. कोलकाता पोलिसांनी ट्रेनी डॉक्टरचा मृतदेह आढळल्यानंतर, दुसऱ्या दिवशी म्हणजे 10 ऑगस्टला संजय रॉयला अटक केली होती.