Sanjay Roy : कोलकाता पोलीस आयुक्तांच्या नावावर रजिस्टर्ड आहे आरोपी संजयची बाईक, धक्कादायक खुलासा

By ऑनलाइन लोकमत | Published: August 27, 2024 01:50 PM2024-08-27T13:50:41+5:302024-08-27T14:02:24+5:30

Kolkata Doctor Case And Sanjay Roy : आरोपी संजय रॉय याने घटनेच्या रात्री वापरलेली बाईक कोलकाता "पोलीस आयुक्त" यांच्या नावावर रजिस्टर्ड आहे.

Kolkata Doctor Case accused Sanjay Roy bike is registered in name of kolkata police commissioner | Sanjay Roy : कोलकाता पोलीस आयुक्तांच्या नावावर रजिस्टर्ड आहे आरोपी संजयची बाईक, धक्कादायक खुलासा

Sanjay Roy : कोलकाता पोलीस आयुक्तांच्या नावावर रजिस्टर्ड आहे आरोपी संजयची बाईक, धक्कादायक खुलासा

कोलकाता बलात्कार आणि हत्याप्रकरणी धक्कादायक खुलासा झाला आहे. आरोपी संजय रॉय याने घटनेच्या रात्री वापरलेली बाईक कोलकाता "पोलीस आयुक्त" यांच्या नावावर रजिस्टर्ड आहे. सीबीआयने दोन दिवसांपूर्वी आरोपीची बाईक जप्त केली होती. सीबीआयच्या म्हणण्यानुसार, आरोपी संजय रॉयची ही बाईक मे २०२४ मध्ये रजिस्टर्ड झाली होती. पोलिसांच्या नावावर नोंद असलेल्या बाईकवर आरोपीने मद्यधुंद अवस्थेत १५ किलोमीटरचा प्रवास केला होता.

ही माहिती समोर आल्यानंतर या प्रकरणातील मुख्य आरोपी संजय रॉय आणि पोलिसांचे काहीतरी संबंध असल्याचं समोर येत आहे आणि हा पुरावा सीबीआयच्या हाती लागला आहे. सीबीआयने जप्त केलेली ही तीच बाईक आहे जी घटनेच्या रात्री आरोपी मद्यधुंद अवस्थेत चालवत होता. घटनेच्या रात्री आरोपीने या बाईकवरून १५ किलोमीटरचा प्रवास केला होता. या प्रकरणावर, पोलिसांचं म्हणणे आहे की, कोलकाता पोलिसांनी वापरलेली सर्व वाहनं आणि बाईक पोलिस आयुक्तांच्या कार्यकाळात रजिस्टर्ड असतात.

सीबीआयच्या सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, सीबीआयकडे ही बाईक कुठून आली हे शोधण्याचा प्रयत्न केला जात आहे. ही बाईक त्याची होती की दुसऱ्याची? ज्यात सीबीआयला मिळालेल्या माहितीनुसार ही बाईक कोलकाता पोलीस आयुक्तांच्या नावावर रजिस्टर्ड आहे. आता सीबीआय आरोपीकडे ही बाईक कुठून आली याचा शोध घेत आहेत. कारण सिविक व्हॉलंटियर असल्याने संजय रॉयला पोलिसांच्या नावावर रजिस्टर्ड असलेली बाईक चालवण्याचा अधिकार नव्हता.

जर एखादी व्यक्ती पोलिसांची बाईक वापरत असेल, तर या व्यक्तीला कोणत्याही नाकाबंदीवर, कोणत्याही बॅरिकेडवर किंवा कोणत्याही तपासणीदरम्यान थांबवलं जात नाही. घटनेच्या दिवशीही आरोपीने दारूच्या नशेत सुमारे १५ किलोमीटर दुचाकी चालवली होती आणि त्यानंतर ती बाईक घेऊन आरजी रुग्णालयात गेला होता. संजय रॉयने बाईक चालवताना पोलिसांचे हेल्मेट परिधान केले होते. पोलिसांनी आरोपीला त्यामुळे रोखलं नाही.

Web Title: Kolkata Doctor Case accused Sanjay Roy bike is registered in name of kolkata police commissioner

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.