"जोपर्यंत मरत नाही तोपर्यंत तिचा गळा दाबला अन्..."; आरोपी संजयने सांगितलं नेमकं काय घडलं?

By ऑनलाइन लोकमत | Published: August 28, 2024 05:26 PM2024-08-28T17:26:25+5:302024-08-28T17:30:31+5:30

Kolkata Doctor Case : कोलकाता येथील आरजी कर मेडिकल कॉलेजमध्ये झालेल्या बलात्कार आणि हत्या प्रकरणाता नवा धक्कादायक खुलासा झाला आहे.

Kolkata Doctor Case accused Sanjay Roy polygraph test reveals how kill woman trainee doctor | "जोपर्यंत मरत नाही तोपर्यंत तिचा गळा दाबला अन्..."; आरोपी संजयने सांगितलं नेमकं काय घडलं?

"जोपर्यंत मरत नाही तोपर्यंत तिचा गळा दाबला अन्..."; आरोपी संजयने सांगितलं नेमकं काय घडलं?

कोलकाता येथील आरजी कर मेडिकल कॉलेजमध्ये झालेल्या बलात्कार आणि हत्या प्रकरणाता नवा धक्कादायक खुलासा झाला आहे. ट्रेनी डॉक्टरचा जीव वाचू शकला असता, मात्र तिने आरडाओरडा केल्यावर आरोपीने तिचा गळा दाबून हत्या केली. हा खुलासा आरोपी संजय रॉय यानेच केला आहे. ती ओरडत होती, त्यामुळेच गळा दाबून हत्या केली असं सांगितलं. या भयंकर घटनेचे संपूर्ण सत्य जाणून घेण्यासाठी केंद्रीय अन्वेषण विभागाने (CBI) संजय रॉयची पॉलीग्राफ टेस्ट केली आहे.

संजय रॉयने टेस्टमध्ये सांगितलं की, ट्रेनी डॉक्टर जेव्हा सेमिनार हॉलमध्ये झोपली होती तेव्हा तो तिथे गेला आणि तिच्यावर बलात्कार करण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी डॉक्टर गाढ झोपेत होती. संजय रॉय तिथे पोहोचताच तिच्यावर बलात्कार करण्याचा प्रयत्न केला. याच दरम्यान तिने स्वत:ला वाचवण्याचा प्रयत्न केला. संजयच्या शरीरावर काही खुणा आहेत. 

आरोपीने चौकशीदरम्यान पुढे सांगितलं की, डॉक्टर आरडाओरडा करत असल्याने त्याने तिला मारलं. सेमिनार हॉलमधून जात असताना कोणीतरी तिचा आवाज ऐकून येईल, अशी भीती संजयला वाटत होती. संजय म्हणाला की, तिचा गळा दाबला आणि जोपर्यंत ट्रेनी डॉक्टर मरत नाही तोपर्यंत तो तिचा गळा दाबत राहिला. 

संजय बॉक्सिंग खेळाडू होता हे देखील समोर आलं आहे, त्यामुळे ट्रेनी डॉक्टर स्वतःला त्याच्या तावडीतून वाचवण्यात अपयशी ठरली. पीडितेने स्वत:ला वाचवण्याचा पुरेपूर प्रयत्न केला, आरडाओरडाही केला, पण संजयने तिचा आवाज दाबला. ९ ऑगस्ट रोजी सकाळी ट्रेनी डॉक्टरचा मृतदेह सेमिनार हॉलमध्ये आढळून आला. दुसऱ्या दिवशी संजय रॉयला अटक करण्यात आली.
 

Web Title: Kolkata Doctor Case accused Sanjay Roy polygraph test reveals how kill woman trainee doctor

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.