Kolkata Doctor Case : फक्त २९ मिनिटं... आरोपीच्या जीन्स, शूजवर ट्रेनी डॉक्टरचं रक्त; CBI च्या आरोपपत्रात मोठा खुलासा

By ऑनलाइन लोकमत | Published: October 9, 2024 01:25 PM2024-10-09T13:25:55+5:302024-10-09T13:42:04+5:30

Kolkata Doctor Case : पश्चिम बंगालच्या आरजी कार मेडिकल कॉलेजमध्ये ट्रेनी डॉक्टर हत्याकांडाप्रकरणी देशभरातून संताप व्यक्त होत आहे.

Kolkata Doctor Case post mortem was conducted 12 hours after the murder | Kolkata Doctor Case : फक्त २९ मिनिटं... आरोपीच्या जीन्स, शूजवर ट्रेनी डॉक्टरचं रक्त; CBI च्या आरोपपत्रात मोठा खुलासा

Kolkata Doctor Case : फक्त २९ मिनिटं... आरोपीच्या जीन्स, शूजवर ट्रेनी डॉक्टरचं रक्त; CBI च्या आरोपपत्रात मोठा खुलासा

पश्चिम बंगालच्या आरजी कार मेडिकल कॉलेजमध्ये ट्रेनी डॉक्टर-बलात्कार हत्याकांडप्रकरणी देशभरातून संताप व्यक्त होत आहे. या प्रकरणी न्याय मिळावा या मागणीसाठी देशभरात अजूनही निदर्शनं सुरू आहेत. आता या प्रकरणी सीबीआयने दाखल केलेल्या आरोपपत्रानुसार, हत्येनंतर १२ तासांनी सायंकाळी ६.१० वाजता डॉक्टरचं पोस्टमार्टम करण्यात आलं. पोस्टमार्टम रिपोर्टनुसार गळा दाबून आणि गुदमरल्याने मृत्यू झाला आहे.

ट्रेनी डॉक्टरवर जबरदस्तीने बलात्कार करून तिची हत्या करण्यात आली. आरोपींच्या शरीरावर पाच जखमांच्या खुणाही आढळून आल्या आहेत. सीसीटीव्ही फुटेजनुसार, आरोपी ९ ऑगस्ट रोजी पहाटे ४.०३ वाजता सेमिनार हॉलमध्ये घुसला आणि ४.३२ वाजता बाहेर आला. आरोपी संजय रॉयच्या जीन्स आणि शूजवर ट्रेनी डॉक्टरचं रक्त आढळून आलं आहे. गुन्ह्याच्या ठिकाणी सापडलेलं ब्लूटूथ त्याच्या मोबाईलसोबत कनेक्ट केलेलं होतं. पुराव्याच्या आधारे डीएनए विश्लेषणात संजय रॉय आरोपी असल्याचं समोर आलं आहे.

घटनास्थळी आरोपी संजय रॉयच्या मोबाईलचं लोकेशन देखील सापडलं आहे. घटनास्थळी आरोपीचे केस आढळून आले, आरोपीच्या तोंडातील लाळ डॉक्टरच्या अंगावर आढळून आली, डॉक्टरच्या अंगावर वीर्य सापडलं आणि ते आरोपी संजयचं असल्याचं आढळून आलं. डॉक्टरला फरफटत नेलं, तिचा कुर्ताही फाटलेला होता. तसेच चष्माही तोडण्यात आला.

आरोपी संजयने डॉक्टरवर बलात्कार करून तिची हत्या केल्याचं पुराव्यावरून स्पष्ट झालं आहे. तळा पोलीस स्टेशनचे एसएचओ अभिजीत मंडल आणि आरजी कर कॉलेजचे माजी प्राचार्य यांनी प्रकरण दडपण्याचा आणि पुरावे नष्ट करण्याचा प्रयत्न केला, त्यांना अटक करण्यात आली. पुढील कटाचा उलगडा करण्यासाठी सखोल तपास सुरू आहे. ट्रेनी डॉक्टरच्या वडिलांच्या तक्रारीवरून एफआयआर दाखल करण्यात आला.

८ ऑगस्ट रोजी, ट्रेनी डॉक्टर २४ तासांच्या नाईट शिफ्टवर होती, ती रात्री ११.१५ वाजता तिच्या आईशी फोनवर बोलली होती. रात्री १०.१५ च्या सुमारास पीडितेने पाच जणांसाठी जेवणाची ऑर्डर दिली होती. मोबाईलवर ऑलिम्पिकमधील भालाफेक फायनल पाहताना तिने सेमिनार हॉलमध्ये जेवण केलं. यानंतर सर्वजण आपापल्या कामासाठी गेले.

दुसऱ्या दिवशी ९.३५ च्या सुमारास एका डॉक्टरने ट्रेनी डॉक्टरचा शोध सुरू केला. तेव्हा सेमिनार हॉलमध्ये तिचा मृतदेह सापडला. डॉक्टरच्या आई-वडिलांना फोन करून याबाबत माहिती दिली. ते आले तेव्हा त्यांनी कित्येक तास उभं ठेवण्यात आलं. तरुणी रक्ताच्या थारोळ्यात पडली होती. शरीरावर अनेक जखमा होता. या घटनेने सर्वांनाच मोठ धक्का बसला आहे. 

Web Title: Kolkata Doctor Case post mortem was conducted 12 hours after the murder

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.