Sandip Ghosh : कोलकाता प्रकरण : संदीप घोषने जाणूनबुजून केली दिशाभूल; CBI च्या रिमांड नोटमध्ये मोठा खुलासा

By ऑनलाइन लोकमत | Published: September 16, 2024 01:25 PM2024-09-16T13:25:14+5:302024-09-16T13:32:43+5:30

Kolkata Doctor Case And Sandip Ghosh : कोलकाता ट्रेनी डॉक्टर हत्या प्रकरणात एक नवीन अपडेट समोर आली आहे. आरोपी संदीप घोषच्या सीबीआय कोठडीबाबत नवी माहिती मिळाली.

Kolkata Doctor Case Sandip Ghosh deliberately misled investigation revealed in cbi remand note | Sandip Ghosh : कोलकाता प्रकरण : संदीप घोषने जाणूनबुजून केली दिशाभूल; CBI च्या रिमांड नोटमध्ये मोठा खुलासा

Sandip Ghosh : कोलकाता प्रकरण : संदीप घोषने जाणूनबुजून केली दिशाभूल; CBI च्या रिमांड नोटमध्ये मोठा खुलासा

कोलकाता ट्रेनी डॉक्टर बलात्कार-हत्या प्रकरणात एक नवीन अपडेट समोर आली आहे. आरोपी संदीप घोषच्या सीबीआय कोठडीबाबत नवी माहिती मिळाली. पॉलीग्राफ टेस्टच्या CFSL रिपोर्टमध्ये म्हटलं आहे की, संदीप घोषने काही महत्त्वाच्या मुद्द्यांवर तपास करणाऱ्यांची जाणीवपूर्वक दिशाभूल करण्याचा प्रयत्न केला. तपासादरम्यान संदीप घोषची एलव्हीए आणि पॉलीग्राफी टेस्ट करण्यात आली होती. 

CFSL नवी दिल्लीच्या रिपोर्टनुसार, या प्रकरणाशी संबंधित काही महत्त्वाच्या मुद्द्यांवर संदीप घोषचं विधान दिशाभूल करणारं आढळून आलं आहे. या प्रकरणी एफआयआर दाखल करण्याचा संदीप घोषचा विचार नव्हता अशी माहिती समोर आली आहे. सकाळी ९.५८ वाजता माहिती मिळाल्यानंतरही तो महाविद्यालयात पोहोचला नाही. संदीप घोषने हत्येबाबत तक्रार केलेली नाही. सुरुवातीला सर्वच जण आत्महत्या केल्याचं म्हणत होते. 

वकिलाचा सल्ला घेऊनही संदीप घोषने एफआयआर दाखल करण्याचा विचार केला नव्हता. सकाळी १० वाजल्यापासून तो अभिजित मंडलच्या संपर्कात होता, परंतु त्याने बलात्काराची घटना दाबण्याचा प्रयत्न केला, त्यामुळे पुरावे नष्ट करण्यात आले.सीबीआयने आपल्या रिमांड नोटमध्ये म्हटलं आहे की, अभिजीत मंडलने संजय रॉय आणि इतरांच्या स्क्रीनिंगमध्ये अन्य संभाव्य आरोपींसोबत गुन्हेगारी कट रचला आणि तपासाची दिशा वळवण्याचा प्रयत्न केला.

सीबीआयचे म्हणणं आहे की आरोपींनी जाणूनबुजून अनैसर्गिक मृत्यूचा गुन्हा दाखल केला आणि जाणूनबुजून खोटी तथ्ये नोंदवली. रुग्णालय प्रशासनासोबत मिळून हे सर्व करण्यात आलं. तसेच अशा प्रकारे आरोपी संजय रॉयला वाचवण्याचा देखील प्रयत्न करण्यात आला. आरजी कर रुग्णालयाच्या सेमिनार हॉलमध्ये ट्रेनी डॉक्टरवर बलात्कार करून तिची हत्या करण्यात आली. याप्रकरणी संजय रॉयला अटक करण्यात आली आहे. 
 

Web Title: Kolkata Doctor Case Sandip Ghosh deliberately misled investigation revealed in cbi remand note

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.