Kolkata Doctor Case : "मी माझ्या मुलीला मृत्यूपूर्वी झालेल्या वेदनांचा विचार करते तेव्हा माझा थरकाप होतो..."

By ऑनलाइन लोकमत | Published: September 9, 2024 12:21 PM2024-09-09T12:21:28+5:302024-09-09T12:28:56+5:30

Kolkata Doctor Case : डॉक्टरच्या पालकांनीही कोलकाता पोलिसांवर गुन्हा लपवण्याचा प्रयत्न केल्याचा गंभीर आरोप केला आहे.

Kolkata Doctor Case victim mother accuses police for hiding crime rg kar medical college hospital | Kolkata Doctor Case : "मी माझ्या मुलीला मृत्यूपूर्वी झालेल्या वेदनांचा विचार करते तेव्हा माझा थरकाप होतो..."

Kolkata Doctor Case : "मी माझ्या मुलीला मृत्यूपूर्वी झालेल्या वेदनांचा विचार करते तेव्हा माझा थरकाप होतो..."

कोलकाता येथील आरजी कर मेडिकल कॉलेज आणि हॉस्पिटलमध्ये एका ट्रेनी डॉक्टरवर झालेल्या अत्याचाराच्या घटनेनंतर देशभरात संतापाचे वातावरण आहे. आंदोलन करून लोक बलात्कार आणि हत्येतील दोषींना फाशीची शिक्षा देण्याची मागणी करत आहेत. याच दरम्यान, डॉक्टरच्या पालकांनीही कोलकाता पोलिसांवर गुन्हा लपवण्याचा प्रयत्न केल्याचा गंभीर आरोप केला आहे.

रविवारी पीडितेच्या पालकांनी सांगितलं की, या प्रकरणात पोलिसांनी गुन्हा लपवण्याचा प्रयत्न केला आहे. टाईम्स ऑफ इंडियाशी बोलताना डॉक्टरच्या आईने म्हटलं की, आम्हाला न्याय सहजासहजी मिळणार नाही पण आम्हाला तो हिरावून घ्यावा लागेल आणि सर्वांच्या मदतीशिवाय हे शक्य नाही. कोलकाता बलात्कार हत्या प्रकरणात न्याय मिळावा या मागणीसाठी रविवारी हजारो लोकांनी मोर्चा काढला आणि त्यात डॉक्टर मुलीचे पालकही सहभागी झाले होते.

कोलकाता पोलिसांवर मोठा आरोप

कोलकाता पोलीस मदत करत नसल्याचा आरोपही डॉक्टरच्या आईने केला आहे. आईने दिलेल्या माहितीनुसार, पोलिसांनी आम्हाला सुरुवातीपासून सहकार्य केलेलं नाही. त्यांनी थोडंसं सहकार्य केलं असतं तर आम्हाला आशेचा किरण मिळू शकला असता. पोलिसांनी हा मोठा गुन्हा लपविण्याचा प्रयत्न केला आणि पुराव्यांशीही छेडछाड केली.

"आता हे आंदोलक माझी मुलं आहेत"

मीडियाशी संवाद साधताना डॉक्टरच्या आईने सांगितलं की, जेव्हा जेव्हा मी माझ्या मुलीला मृत्यूपूर्वी झालेल्या वेदनांचा विचार करते तेव्हा भीतीने माझा थरकाप होतो. माझ्या मुलीचे स्वप्न हे समाजसेवा होते पण आता हे आंदोलक माझी मुलं आहेत. वडिलांनी सांगितलं की, लोकांच्या मोठ्या पाठिंब्यामुळे आपल्याला मुलीच्या न्यायासाठी आवाज उठवण्याची हिंमत मिळाली आहे. महत्त्वाची बाब म्हणजे या प्रकरणी एफआयआर नोंदवण्यास १४ तासांचा विलंब झाल्यानंतर आरजी कर मेडिकल कॉलेज आणि हॉस्पिटलच्या अधिकाऱ्यांसह पोलिसांच्या भूमिकेवरही प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
 

Web Title: Kolkata Doctor Case victim mother accuses police for hiding crime rg kar medical college hospital

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.