Sanjoy Roy : कोलकाता प्रकरण : आरोपी संजय रॉय न्यायाधीशांसमोर ढसाढसा रडला; कोर्टरुममध्ये काय घडलं?

By ऑनलाइन लोकमत | Published: August 24, 2024 05:27 PM2024-08-24T17:27:48+5:302024-08-24T17:35:50+5:30

Kolkata Doctor Case And Sanjoy Roy : संजयला कोर्टात न्यायाधीशांसमोर हजर केले असता तो ढसाढसा रडायला लागला आणि आपण निर्दोष असल्याचा दावा करू लागला.

kolkata Doctor murder case accused Sanjoy Roy breaks down in high court | Sanjoy Roy : कोलकाता प्रकरण : आरोपी संजय रॉय न्यायाधीशांसमोर ढसाढसा रडला; कोर्टरुममध्ये काय घडलं?

Sanjoy Roy : कोलकाता प्रकरण : आरोपी संजय रॉय न्यायाधीशांसमोर ढसाढसा रडला; कोर्टरुममध्ये काय घडलं?

कोलकात्याच्या आरजी कर मेडिकल कॉलेज आणि हॉस्पिटलमधील ट्रेनी डॉक्टरच्या बलात्कार आणि हत्या प्रकरणाने संपूर्ण देश हादरला आहे. या प्रकरणातील मुख्य आरोपी संजय रॉय याला अटक करण्यात आली आहे. संजयला कोर्टात न्यायाधीशांसमोर हजर केले असता तो ढसाढसा रडायला लागला आणि आपण निर्दोष असल्याचा दावा करू लागला.

सेंट्रल ब्युरो ऑफ इन्व्हेस्टिगेशनने (CBI) संजय रॉयला कोलकाता न्यायालयात हजर केलं आणि या प्रकरणातील आरोपी आणि इतर संशयितांच्या पॉलीग्राफ टेस्टसाठी परवानगी मागितली. न्यायालयाची आणि संशयिताची संमती मिळाल्यानंतरच लाय डिटेक्टर टेस्ट म्हणजेच पॉलीग्राफ टेस्ट केली जाऊ शकते.

"मी कोणताही गुन्हा केलेला नाही"

कोर्टात, जेव्हा न्यायाधीशांनी संजय रॉयला पॉलीग्राफ टेस्टसाठी सहमत आहे का? असा प्रश्न विचारला, तेव्हा तो रडायला लागला आणि म्हणाला की निर्दोष असल्याचा विश्वास असल्यामुळेच आपण लाय डिटेक्टर टेस्टसाठी सहमती दिली आहे. तो म्हणाला, "मला फसवलं जात आहे. मी कोणताही गुन्हा केलेला नाही. कदाचित या टेस्टमुळे मी निर्दोष असल्याचं सिद्ध होईल."

१४ दिवसांची न्यायालयीन कोठडी

त्यानंतर संजयची पॉलीग्राफ टेस्ट घेण्यास परवानगी देण्यात आली. त्याला १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे. मेडिकल कॉलेज आणि हॉस्पिटलचे माजी प्रिन्सिपल संदीप घोष आणि या प्रकरणाशी संबंधित इतर पाच जणांची लाय डिटेक्टर टेस्ट करण्यास न्यायालयाने परवानगी दिली आहे.

५ जणांची केली जाईल पॉलीग्राफ टेस्ट 

ज्या लोकांची लाय डिटेक्टर टेस्ट होणार आहे, त्यामध्ये दोन पोस्ट ग्रेज्युएट फर्स्ट इअरचे ट्रेनी डॉक्टर, एक हाऊस सर्जन आणि एक इंटर्न यांचा समावेश आहे. यासोबतच महाविद्यालयाचे माजी प्रिन्सिपल संदीप घोष यांची लाय डिटेक्टर टेस्टही घेण्यात येणार आहे.

याप्रकरणी माजी डेप्युटी सुपरीटेंडेंट यांनी मोठा खुलासा करत महाविद्यालयाचे माजी प्रिन्सिपल संदीप घोष हे एका माफियासारखे भ्रष्ट व्यक्ती असून, अशा लोकांना आधी हटवलं पाहिजे, असं सांगितले. हे लोक मृतदेह विकायचे आणि कोणालाही याची माहितीही नव्हती. घोष यांच्याकडे एवढा पैसा आणि सत्ता आहे की, एवढं करूनही त्यांना सस्पेंड करण्यात आलं नाही असंही म्हटलं आहे. 
 

Web Title: kolkata Doctor murder case accused Sanjoy Roy breaks down in high court

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.