Kolkata Doctor Murder : 'चार लग्न, पॉर्न पाहण्याचे व्यसन, कोलकाता डॉक्टर हत्या प्रकरणातील आरोपींबाबत मोठा खुलासा
By ऑनलाइन लोकमत | Published: August 13, 2024 12:07 PM2024-08-13T12:07:49+5:302024-08-13T12:08:16+5:30
Kolkata Doctor Murder : बंगाल पोलिसांनी आरोपी संजय रॉय बाबत मोठे खुलासे केले आहेत.
Kolkata Doctor Murder : पश्चिम बंगाल मधील कोलकाता येथील आरजी कार मेडिकल कॉलेजच्या डॉक्टरने केलेल्या क्रूरतेमुळे देशभरात खळबळ उडाली. डॉक्टरवर बलात्कार करुन खून केल्याप्रकरणी पोलिसांनी आरोपी संजय रॉयला अटक केली, आरोपीने गुन्ह्याची कबुली दिली असून अनेक धक्कादायक खुलासेही केले आहेत. आरोपींना कठोरात कठोर शिक्षा देण्याची मागणी होत आहे.
दरम्यान, सोमवारी पोलिसांनी आरोपी संजय रॉय बाबत अनेक खुलासे केले. आरोपीला अश्लील व्हिडीओ पाहण्याचे व्यसन असून त्याच्या मोबाईलमध्ये असे अनेक अश्लील व्हिडीओ सापडल्याची माहिती पोलिसांनी दिली. त्याच्या मोबाईलमध्ये सापडलेला मजकूर अत्यंत क्रूर आणि हिंसक होता, असंही पोलिसांनी सांगितले.
जन्मठेपेची शिक्षा भोगणारा गुरमीत राम रहीम पुन्हा तुरुंगातून बाहेर, मिळाली 21 दिवसांची रजा...
तीन विवाह केले
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी रॉय याने चार लग्न केले आहेत, त्याचे आता वय ३३ आहे. तपासादरम्यान तो त्याच्या पत्नींसोबतही हिंसाचार करत असल्याचे समोर आले. रॉय याच्या शेजाऱ्यांनी सांगितले की, त्याची पहिली पत्नी बेहाला येथील होती, तर दुसरी पत्नी पार्क सर्कसची होती. त्याने बराकपूर येथील एका मुलीशी तिसरे लग्न केले. पण तेही फार काळ टिकले नाही. त्यानंतर शहरातील अलीपूर भागातील एका मुलीशी लग्न केले, रॉय याच्या घरातून मारहाणीचे नेहमी येत होते, अशी माहिती शेजाऱ्यांनी दिल्याचे पोलिसांनी सांगितले.
“अलिपूरमधील पेट्रोल पंपावर काम करणाऱ्या त्याच्या चौथ्या पत्नीनेही घरगुती हिंसाचाराची तक्रार दाखल केली होती, जी कायदेशीर विभक्त होईपर्यंत चालू होती,असंही पोलिसांनी सांगितले.
पोलिसांनी दिलेली माहिती अशी, आरोपी संजय रॉय हा सामाजिक कार्यकर्ता बनून रुग्णालयात नेहमी ये-जा करत होता. असे स्वयंसेवक कंत्राटी कर्मचारी असतात. वाहतूक व्यवस्थापनासाठी वाहतूक पोलिसांना मदत करतात. सणासुदीच्या काळात सरकारी कर्मचाऱ्यांच्या मदतीसाठी जातात. अनधिकृत पार्किंद हटवण्यासाठी मगत करतात. हे स्वयंसेवक पोलिसांनाही मदत करतात. रॉय पोलिसांच्या संपर्कात काही दिवसापूर्वीच आला होता.