Sanjay Roy : संजय रॉयबाबत मित्रांचा धक्कादायक खुलासा; तो दिसताच शेजारच्या महिला बंद करायच्या दरवाजा
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 25, 2024 17:32 IST2024-08-25T17:24:28+5:302024-08-25T17:32:04+5:30
Kolkata Doctor Case And Sanjay Roy : संजय रॉय याच्याबाबत सीबीआयच्या तपासात आतापर्यंत ज्या गोष्टी समोर आल्या आहेत, त्या अत्यंत धक्कादायक आहेत. आता संजय रॉयच्या मित्रांनी त्याच्याबद्दल केलेला दावा आणखी भयंकर आहे.

Sanjay Roy : संजय रॉयबाबत मित्रांचा धक्कादायक खुलासा; तो दिसताच शेजारच्या महिला बंद करायच्या दरवाजा
कोलकाता येथील डॉक्टरवर झालेल्या बलात्कार आणि हत्या प्रकरणातील मुख्य आरोपी संजय रॉय याच्याबाबत सीबीआयच्या तपासात आतापर्यंत ज्या गोष्टी समोर आल्या आहेत, त्या अत्यंत धक्कादायक आहेत. आता संजय रॉयच्या मित्रांनी त्याच्याबद्दल केलेला दावा आणखी भयंकर आहे. संजय रॉयला २६ वर्षांपासून ओळखणाऱ्या त्याच्या मित्रांनी सांगितलं की, "दारू प्यायल्यानंतर संजय जनावरांसारखा वागायचा."
"संजय त्याच्या मित्रांच्या बहिणींवरही वाईट नजर ठेवत असे. दारू पिणे आणि मुलींची छेड काढणे या संजयच्या सवयी होत्या. याशिवाय तो पत्नीलाही बेदम मारहाण करायचा." भवानीपूरमध्ये संजयच्या शेजारी राहणाऱ्या अनेक महिलांनी सांगितलं की, तो चांगला माणूस नव्हता. तो महिलांकडे टक लावून पाहत असे, आम्ही आमच्या घराचे दरवाजे बंद करायचो." न्यूज १८ हिंदीशी संवाद साधताना महिलांनी ही माहिती दिली आहे.
कोलकाता येथील आरजी कर मेडिकल कॉलेज आणि हॉस्पिटलमध्ये झालेल्या बलात्कार-हत्या प्रकरणात संजय रॉय हा मुख्य आरोपी आहे. एएनआय या वृत्तसंस्थेशी बोलताना त्याच्या बहिणीने काही धक्कादायक गोष्टी सांगितल्या. ती म्हणाली की, "मी १७ वर्षांपासून त्याच्याशी बोलले नाही, भेटले नाही. अनेक वर्षे त्याला पाहिलं नाही, त्यामुळे काही सांगता येत नाही. माझ्या लग्नासाठी वडील तयार नव्हते. जर हे लग्न झालं तर आपला कोणताही संबंध राहणार नाही, असं त्याने सांगितलं होतं. त्यामुळे कोणतंही नातं नव्हतं."
"मी त्याला भेटले तर विचारेन..."; संजयच्या आईचं मोठं विधान
संजय रॉयच्या आईने तो निर्दोष असल्याचा दावा केला आहे. एका खासगी वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत त्याची आई म्हणाली की, "मी त्याच्याशी अधिक कठोर वागले असते तर ही घटना टाळता आली असती. जर मी जास्त कडक झाले असते तर हे घडलं नसतं. आपला मुलगा शाळेत टॉपर होता आणि नॅशनल कॅडेट कोरचा भाग होता. तो माझी खूप काळजी घ्यायचा आणि माझ्यासाठी जेवणही बनवायचा. तुम्ही शेजाऱ्यांनाही विचारू शकता, त्याने कधीही कोणाशीही गैरवर्तन केलं नाही. जर मी त्याला भेटले तर विचारेन, 'बाबू, तू असं का केलंस?' माझा मुलगा असा कधीच नव्हता."