कोलकाता हादरलं! महिलेवर गोळीबार करून पोलीस कर्मचाऱ्याने उचललं टोकाचं पाऊल
By ऑनलाइन लोकमत | Published: June 10, 2022 08:24 PM2022-06-10T20:24:57+5:302022-06-10T21:05:04+5:30
Firing And Suicide Case : यात गोळ्या लागल्याने एका महिलेचा मृत्यू झाला, तर अनेक जण जखमी झाले. नंतर त्याने स्वत:वरही गोळी झाडली.
कोलकाता शहर पुन्हा एकदा हत्येच्या घटनेने हादरलं आहे. कोलकाता येथील बांग्लादेश उच्चायुक्तालयाबाहेर तैनात असलेल्या एका पोलिसानेगोळीबार केल्याची घटना घडली आहे. यामध्ये एका महिलेचा मृत्यू झाला असून घटनेनंतर पोलीस कर्मचाऱ्याने स्वत:वरही गोळी झाडत आत्महत्या केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. गोळीबार करणाऱ्या पोलीस कर्मचाऱ्याने दोन ते तीन वेळी गोळीबार केला. यात गोळ्या लागल्याने एका महिलेचा मृत्यू झाला.
एका पोलीस कर्मचाऱ्याने महिलेची हत्या केल्यानंतर आत्महत्या केली. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे. या गोळीबारात एक दुचाकी चालकही गोळी लागल्याने जखमी झाला आहे. घटनेची माहिती मिळताच कोलकाता पोलीस घटनास्थळी पोहोचले असून परिसराची नाकाबंदी करण्यात आली आहे. मृत पोलीस कर्मचारी शुक्रवारीच ड्युटीवर रुजू झाला होता. तसेच पोलीस कर्मचाऱ्याच्या गोळीबारात ठार झालेल्या महिलेचीही ओळख अद्याप पटलेली नाही.
घटनेनंतर घटनास्थळी मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. या प्रकरणाचा तपास सुरू करण्यात आला असून गृह मंत्रालयानेही या प्रकरणाची दखल घेत पश्चिम बंगाल सरकारकडून अहवाल मागवला आहे.
West Bengal | A woman biker died after one Police personnel fired bullets outside Bangladesh Deputy High Commission in Kolkata. The Police personnel then shot himself dead. Senior Police officials are present at the spot. Further details awaited. pic.twitter.com/6hLdV4LHBl
— ANI (@ANI) June 10, 2022