Kolkata Case : "मी माझी एक मुलगी गमावली, पण..."; कोलकाता निर्भया प्रकरणातील वडिलांनी मांडली व्यथा

By ऑनलाइन लोकमत | Published: August 17, 2024 01:41 PM2024-08-17T13:41:52+5:302024-08-17T13:48:11+5:30

Kolkata Murder Case : सध्या सुरू असलेल्या आंदोलन आणि निषेध रॅलींबद्दल विचारलं असता मुलीची आई म्हणाली की, आम्ही देश-विदेशात होणाऱ्या आंदोलनांना १०० टक्के पाठिंबा देतो.

kolkata lady doctor murder case victim father press conference | Kolkata Case : "मी माझी एक मुलगी गमावली, पण..."; कोलकाता निर्भया प्रकरणातील वडिलांनी मांडली व्यथा

Kolkata Case : "मी माझी एक मुलगी गमावली, पण..."; कोलकाता निर्भया प्रकरणातील वडिलांनी मांडली व्यथा

कोलकाता येथील आरजी कर मेडिकल कॉलेजमध्ये महिला डॉक्टरवर झालेल्या बलात्कार आणि हत्येप्रकरणी लोकांमध्ये संताप असून देशभरातील ट्रेनी डॉक्टर आपला निषेध व्यक्त करत आहेत. याच दरम्यान, मुलीच्या वडिलांनी आपली व्यथा मांडली असून, मी माझी एक मुलगी गमावली असली तरी लाखो मुलं आणि मुली आता भेटले आहेत असं म्हटलं. ते खूप दुःखी आहे. आपलं नाव न घेण्याची विनंतीही त्यांनी सर्वांना केली. मृतदेहाच्या फोटोचा संदर्भ देत ते म्हणाले की, माझ्या मुलीचे फोटो शेअर करू नका आणि चुकीची माहिती पसरवू नका.

पीडित महिला डॉक्टरच्या वडिलांनी सांगितलं की, त्या दिवशी सकाळी १०.५३ वाजता आम्हाला हॉस्पिटलच्या सहाय्यक अधीक्षकांचा फोन आला की, मुलीने आत्महत्या केली आहे. रुग्णालयात पोहोचल्यानंतर आम्हाला तिचा मृतदेह दाखवला नाही. दुपारी ३ वाजताच आम्ही तिला पाहिलं. आम्ही खूप दडपणाखाली होतो. काही लोकांनी कारचं नुकसान करण्याचाही प्रयत्न केला. मुख्यमंत्री आमच्या घरी आले. मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी स्वतः सांगितलं होतं की, त्यांना सीबीआय चौकशी हवी आहे. न्यायालयात धाव घेतली आहे. 

सध्या सुरू असलेल्या आंदोलन आणि निषेध रॅलींबद्दल विचारलं असता मुलीची आई म्हणाली की, आम्ही देश-विदेशात होणाऱ्या आंदोलनांना १०० टक्के पाठिंबा देतो. आम्ही सर्व आंदोलकांना आमचे प्रेम पाठवतो. ही सर्वच जणं आमची मुलं आहेत. एक दिवस आधी सहसंचालक व्ही चंद्रशेखर यांच्या नेतृत्वाखालील सीबीआयच्या पथकाने सोदेपूर येथील पीडितेच्या घरी भेट दिली. गुरुवारी दुपारी ४.३० च्या सुमारास सीबीआयचे चार सदस्यीय पथक घरी पोहोचले आणि त्यांनी कुटुंबाशी संवाद साधला. त्यांची भेट घेतल्यानंतर व्ही चंद्रशेखर म्हणाले, तपास सुरू आहे. आम्ही पालकांचे जबाब घेतले आहेत.

कोलकात्याच्या आरजी कार मेडिकल कॉलेजच्या ट्रेनी डॉक्टरवर बलात्कार करून तिची हत्या करण्यात आली होती. या घटनेनंतर ९ ऑगस्टला सकाळी रुग्णालयाच्या सेमिनार हॉलमध्ये महिला डॉक्टरचा मृतदेह आढळून आला. या घटनेनंतर देशभरात संताप व्यक्त होत आहे. यानंतर देशभरात डॉक्टरांचा संप आणि आंदोलन सुरूच आहे. आज देशभरातील ट्रेनी डॉक्टर संपावर असून कोलकाता येथे महिला डॉक्टरच्या हत्येचा निषेध व्यक्त करत आहेत. प्रशिक्षणार्थी डॉक्टरांचा संप रविवारी म्हणजेच उद्या सकाळी ६ वाजेपर्यंत सुरू राहणार आहे. खासगी आणि सरकारी रुग्णालयांमध्ये आपत्कालीन सेवा सुरू राहतील. 
 

Web Title: kolkata lady doctor murder case victim father press conference

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.