'संजय रॉयने बलात्कार आणि खून केला...', आरजी कर प्रकरणात CBI चे आरोपपत्र दाखल
By ऑनलाइन लोकमत | Published: October 7, 2024 04:49 PM2024-10-07T16:49:32+5:302024-10-07T16:56:03+5:30
Kolkata Rape Case: 'संजय रॉयने बलात्कार आणि खून केला...', आरजी कर प्रकरणात CBI चे आरोपपत्र दाखल
Kolkata RG Kar Rape Case:पश्चिम बंगालची राजधानी कोलकाता येथील आरजी कार हॉस्पिटलमधील प्रशिक्षणार्थी महिला डॉक्टरची बलात्कारानंतर निर्घृण हत्या करण्यात आली. या घटनेप्रकरणी संजय रॉय याला खून आणि बलात्काराचा मुख्य आरोपी बनवण्यात आले आहे. सीबीआयच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, या प्रकरणी आरोपपत्रात सुमारे 200 लोकांचे जबाब नोंदवण्यात आले आहेत.
बलात्कार आणि खुनाच्या या प्रकरणात गेल्या शनिवारी (5 ऑक्टोबर) कनिष्ठ डॉक्टर आमरण उपोषणाला बसले होते. ते म्हणाले की, पश्चिम बंगालमधीलममता बॅनर्जी यांचे सरकार त्यांच्या मागण्या पूर्ण करत नसल्याने त्यांना आता आमरण उपोषणाचा मार्ग स्वीकारावा लागला आहे.
मागण्या पूर्ण न झाल्याने डॉक्टर संपावर बसले
आपल्या मागण्या पूर्ण करण्यासाठी आंदोलक डॉक्टरांनी पश्चिम बंगाल सरकारला 24 तासांचा वेळ दिला होता. याबाबत एका कनिष्ठ डॉक्टरने सांगितले की, राज्य सरकारने दिलेल्या मुदतीत त्यांच्या मागण्या पूर्ण केल्या नाहीत. त्यामुळे आमच्या मागण्यांच्या पूर्ततेसाठी आणि पारदर्शकता यावी यासाठी आम्ही उपोषण सुरू करत आहोत.
पश्चिम बंगाल सरकारवर आरोप
या संपूर्ण प्रकरणात मुख्य आरोपी संजय राय याला अटक करण्यात आली होती. या प्रकरणात ममता बॅनर्जी सरकार आरोपींना मदत करत असल्याचा आरोप भाजप करत आहे. या प्रकरणामुळे पश्चिम बंगाल सरकारवर प्रकरण शांत करणे, पुरावे लपवणे असे अनेक आरोप होत आहेत.