दोन किलो सोनं अंडरविअरमध्ये लपवून तस्करीचा प्रयत्न, कोलकात्याच्या विद्यार्थिनीला लखनौमध्ये अटक
By ऑनलाइन लोकमत | Published: April 16, 2021 08:36 PM2021-04-16T20:36:14+5:302021-04-16T20:47:37+5:30
कस्टम विभागाच्या उपायुक्त निहारिका लाखा यांनी सांगितले, की कोलकात्यात राहणारी 22 वर्षिय विद्यार्थिन 2.3 किलोग्रॅम सोन्याची तस्करी करण्याचा प्रयत्न करत होती.
लखनौ - उत्तर प्रदेशची राजधानी असलेल्या लखनौ येथे कोलकात्यातील एका विद्यार्थिनीला अटक करण्यात अली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, तिच्यावर 1 कोटी रुपयांच्या सोन्याच्या तस्करिचा आरोप ठेवण्यात आला आहे. ती 13 एप्रिलला इंडिगोच्या विमानाने दुबईहून लखनौला आली होती. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, या विद्यार्थिनीने जवळपास 2 किलो सोने आपल्या अंडरविअरमध्ये लपवले होते. (Kolkata student smuggling gold of more than 1 crore arrested in lucknow UP)
कस्टम विभागाच्या उपायुक्त निहारिका लाखा यांनी सांगितले, की कोलकात्यात राहणारी 22 वर्षिय विद्यार्थिन 2.3 किलोग्रॅम सोन्याची तस्करी करण्याचा प्रयत्न करत होती. तिने सोन्याचे बिस्किट्स पांढऱ्या पॉलिथीनमध्ये ठेऊन आपल्या अंडरविअरमध्ये लपून ठेवले होते. सोन्याची किंमत 1.13 कोटी रुपये असल्याचा अंदाज आहे. या विद्यार्थिनीचे वडील तांदळाचे ठोक व्यापारी आहेत.
'एका महिला प्रवाशाकडून तस्करीचे सोने हस्तगत होणे एक मोठे यश आहे. या विद्यार्थिनीला दंडाधिकाऱ्यांसमोर उभे करण्यात आले होते. यानंतर तिची कारागृहात रवानगी करण्यात आली आहे, असे निहारिका लाखा यांनी सांगितले.
या विद्यार्थिनीला पहिल्यांदा लखनौ येथे अटक करण्यात आली होती. ती विमानतळाबाहेर वाट पाहत असलेल्या एका व्यक्तीला सोने सोपवणार होती, अशी पुष्टी सीमा शुल्क अधिकऱ्यांनी केली आहे.