कोलकाता निर्भया प्रकरण! "आम्हाला एकदा तरी मुलीला पाहूद्या"; आई-वडिलांनी फोडला टाहो

By ऑनलाइन लोकमत | Published: August 14, 2024 01:53 PM2024-08-14T13:53:26+5:302024-08-14T13:56:25+5:30

"ट्रेनी डॉक्टरचे आई-वडील आणि आम्ही जेव्हा रुग्णालयात आलो तेव्हा आम्हाला तीन तास तिथे उभं करण्यात आलं."

kolkaya nirbhaya lady trainee doctor body found in hospital neighbour told inside story | कोलकाता निर्भया प्रकरण! "आम्हाला एकदा तरी मुलीला पाहूद्या"; आई-वडिलांनी फोडला टाहो

कोलकाता निर्भया प्रकरण! "आम्हाला एकदा तरी मुलीला पाहूद्या"; आई-वडिलांनी फोडला टाहो

कोलकाता येथील आरजी कर मेडिकल कॉलेज आणि हॉस्पिटलमध्ये ९ ऑगस्ट रोजी एका महिला ज्युनियर डॉक्टरचा मृतदेह सापडला होता. सुरुवातीला डॉक्टरने आत्महत्या केल्याचं म्हटलं जात होते, मात्र नंतर डॉक्टरवर बलात्कार करून तिची हत्या करण्यात आल्याचं समोर आलं आहे. याप्रकरणी संजय रॉयला अटक करण्यात आली आहे. या घटनेनंतर देशभरातील निवासी डॉक्टर संपावर गेले आहेत. प्रिन्सिपल आणि सुपरिटेंडेंटला हटवून प्रकरणाचा तपास सीबीआयकडे सोपवण्यात आला. 

'द लॅलनटॉप'ने या घटनेबाबत ट्रेनी डॉक्टरच्या शेजाऱ्यांशी चर्चा केली. त्यांनी जे सांगितलं ते मन हेलावून टाकणारं आहे. "ट्रेनी डॉक्टरचे आई-वडील आणि आम्ही जेव्हा रुग्णालयात आलो तेव्हा आम्हाला तीन तास तिथे उभं करण्यात आलं. आम्हाला एकदा तरी आमची मुलगी दाखवा अशी पालक हात जोडून विनंती करत होते. पण रुग्णालय प्रशासनाने आमचं ऐकलं नाही. त्यानंतर वडिलांनी मृत मुलीचा फोटो आणला असता तिच्या तोंडात रक्त आल्याचं दिसले. चष्मा तुटला होता. अंगावर कपडे नव्हते. दोन्ही पायांची अवस्थाही वाईट होती."

"साडे दहाच्या सुमारास माझी शेजारी (मृत डॉक्टरची आई) मला मिठी मारून ओरडत, रडत रडत म्हणाली की, सर्व काही संपलं आहे. मी विचारलं काय झालं? त्यांनी सांगितलं की, माझ्या मुलीने आत्महत्या केल्याची माहिती हॉस्पिटलमधून मिळाली आहे. कधी आणि कसं झालं असं विचारल्यावर ते म्हणाले की, आम्हाला फक्त एवढच सांगितलं आहे. यानंतर मुलीचे आई-वडील, मी आणि आमचे आणखी एक शेजारी रुग्णालयात पोहोचलो. तिथे आम्हाला तीस तास उभं ठेवलं होतं."

"ज्या आई-वडिलांची ३१ वर्षांची मुलगी अशाप्रकारे गेली त्यांना तीन तास उभं केलं. आम्हाला एकदा आमच्या मुलीला पाहुद्या असं म्हणत आई-वडील हात जोडत होते. पण आम्हाला तिचा चेहरा दाखवला नाही. त्यानंतर पालकांना ते सेमिनार हॉलमध्ये घेऊन गेले. वडिलांनी आपल्या मोबाईलमध्ये तिचा फोटो काढला आणि मला दाखवला. तिच्या तोंडातून रक्त येत होतं. शरीरावर कपडे नव्हते आणि खूप वाईट अवस्था होती. गळा दाबून तिला मारलं होतं."

शेजाऱ्यांनी असंही सांगितलं की, "मी पंतप्रधान आणि राष्ट्रपतींना विनंती करते, जर माझे शब्द त्यांच्यापर्यंत पोहोचत असतील तर या प्रकरणात पीडितेच्या कुटुंबाला योग्य न्याय मिळाला पाहिजे. मी जे काही बोलले ते खरं आहे. या सर्व गोष्टी पोस्टमॉर्टम रिपोर्टमध्ये सांगितल्या आहेत. ती एक हुशार मुलगी होती आणि एक चांगली डॉक्टर होणार होती. तिच्यासोबत घडलेली ही घटना अत्यंत वाईट आहे."

Web Title: kolkaya nirbhaya lady trainee doctor body found in hospital neighbour told inside story

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.