लग्नास नकार दिला म्हणून तरूणी आणि तिच्या आईने तरूणाला जिवंत जाळलं, उपचारादरम्यान मृत्यू
By ऑनलाइन लोकमत | Published: September 3, 2021 12:45 PM2021-09-03T12:45:46+5:302021-09-03T12:46:24+5:30
रायपूरहून परत आल्यावर मृतकाच्या परिवाराने पोलीस स्टेशनमध्ये सूचना दिली की, वेदप्रकाशचा मृत्यू पूजा प्रधान आणि तिच्या आईने पेट्रोल टाकून जाळल्याने झाला.
छत्तीसगढच्या कोरिया जिल्ह्यातील वैकुंठपूरमधून हत्येची एक खळबळजनक घटना समोर आली आहे. पोलिसांनी दावा केला आहे की, एका मुलीने आणि तिच्या आईने एका तरूणाला जिवंत जाळलं. ज्यानंतर उपचारादरम्यान तरूणाचा मृत्यू झाला. १८ ऑगस्ट रोजी वेदप्रकाश गंभीरपणे भाजलेला आढळून आला. ज्याला वेकुंठपूर हॉस्पिटलमध्ये नेण्यात आलं. त्यानंतर त्याला रायपूरला रेफर करण्यात आलं. उपचारादरम्यान २६ ऑगस्टला तरूणाचा मृत्यू झाला.
रायपूरहून परत आल्यावर मृतकाच्या परिवाराने पोलीस स्टेशनमध्ये सूचना दिली की, वेदप्रकाशचा मृत्यू पूजा प्रधान आणि तिच्या आईने पेट्रोल टाकून जाळल्याने झाला. यानंतर वेदप्रकाश याने निधनाआधी दिेलेल्या जबाबानुसार, पूजा प्रधानसोबत त्याची आधीपासून मैत्री होती. घटनेच्या दिवशी पूजाने त्याला घरी बोलवलं होतं. त्यावेळी तिची आई सुद्धा घरात होती. दोघींनी मृतकावर लग्न करण्यास दबाव टाकला आणि ब्लॅकमेल करून पैशांची मागणी केली. (हे पण वाचा : रेप करू शकला नाही म्हणून चावला त्याने महिलेचा कान, नंतर केला धक्कादायक प्रकार)
तरूणाच्या जबाबानुसार, त्याने लग्नास नकार दिल्यावर पूजा आणि तिच्या आईने पेट्रोल टाकून त्याला जाळलं. यानुसार पोलिसांनी एक टीम आरोपींचा शोध घेण्यासाठी पाठवली. त्यांच्या घरी जाऊन पाहिलं तर घटनेच्या दिवसापासूनच दोघीही फरार आहेत. तपासादरम्यान समजलं की, दोन्ही आरोपी महिला तलवापरा येथे दिसल्या. सूचनेनंतर पोलिसांची एक टीम तिथे गेली आणि दोघींनाही अटक केली. चौकशी दरम्यान २१ वर्षीय आरोपी पूजा प्रधान आणि तिची आई प्रमिला प्रधान(४०) यांनी आपला गुन्हा कबूल केला. त्यानंतर त्यांना न्यायालयीन कोठडीत पाठवण्यात आलं.