"हेल्प मी म्हणत ती पळत सुटली अन्...."; जोधपूरला आलेल्या कोरियन युट्युबरसोबत अश्लील वर्तन
By ऑनलाइन लोकमत | Published: April 18, 2023 02:05 PM2023-04-18T14:05:07+5:302023-04-18T14:07:39+5:30
एका तरुणाने परदेशी महिलेसोबत अश्लील कृत्य केले. त्याच्या या वाईट कृत्याचा व्हिडीओ एका पर्यटकाच्या मोबाईलमध्ये कैद झाला आहे.
राजस्थानच्या जोधपूरमध्ये एक धक्कादायक घटना घडली आहे. एका तरुणाने परदेशी महिलेसोबत अश्लील कृत्य केले. त्याच्या या वाईट कृत्याचा व्हिडीओ एका पर्यटकाच्या मोबाईलमध्ये कैद झाला आहे. मुलीने हा व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर केल्यावर हे लज्जास्पद कृत्य उघडकीस आले. याबाबतची माहिती जोधपूर पोलिसांना मिळताच आरोपी तरुणाला अटक करण्यात आली. सध्या हा व्हिडीओ सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे.
पीडित कोरियन महिला जोधपूरला फिरायला आली होती. दक्षिण कोरियातील युनी शहरातील रहिवासी असलेली तरुणी शहराच्या अंतर्गत भागात असलेल्या पचेटिया हिलवर पोहोचली होती. तेथील सुंदर दृश्य ती मोबाईलमध्ये कैद करत होती, त्याच दरम्यान तिला एक तरुण दिसला. ती त्याच्याजवळ येताच तरुणाने तिच्याशी गैरवर्तन केले. व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये हेल्प मी, हेल्प मी म्हणत विदेशी महिला पर्यटक मदतीची याचना करताना पायऱ्यांवरून खाली पळू लागल्याचे दिसत आहे. पण हा तरुण तिथेही तिच्या मागे लागला.
हेल्प मी, हेल्प मी चिल्लाती हुई भागी जोधपुर में कोरियन युवती से अश्लील हरकत युवती ने सोशल मीडिया पर इस वीडियो को अपलोड किया। पुलिस किया युवक को गिरफ्तार@ABPNews@DCPEastJodhpur@ashokgehlot51@SequoiaIndiaSEA@PMOIndia@prempratap04@iampulkitmittal@unwomenasiapic.twitter.com/Tk1RvtDWA6
— करनपुरी (@abp_karan) April 18, 2023
दक्षिण कोरियात राहणारी ही तरुणी ब्लॉगर आहे आणि हा व्हिडीओ सोशल मीडियावर अपलोड करताना त्याने लिहिले आहे की, जोधपूर खूप चांगले आहे. या व्हिडिओसोबत तिने जोधपूर पोलिसांनाही टॅग केले. तरुणीने हा व्हिडीओ सोशल मीडियावर अपलोड केल्यानंतर पोलिसांनी तात्काळ कारवाई केली. या तरुणाची ओळख पटल्यानंतर त्याला कलम 151 अंतर्गत अटक करण्यात आली आहे.
डीसीपी अमृता दुहन यांनी सांगितले की, घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी तातडीने पावले उचलली आणि त्या तरुणाचा शोध सुरू केला. दीपक जालानी असं या तरुणाचं नाव आहे. पोलिसांनी तातडीने पथक पाठवून या तरुणाला ताब्यात घेतले. मंगळवारी आरोपी तरुणाला न्यायालयात हजर केले जाणार आहे. तरुण मानसिकदृष्ट्या कमकुवत असल्याचेही सांगितले जात आहे. त्यावर पोलिसांचे म्हणणे आहे की, त्याची संपूर्ण वैद्यकीय तपासणी केली जाईल जेणेकरून तो मानसिक आजारी असेल तर त्याच्यावर उपचारही केले जातील. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.
सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"