सर्वात मोठी कारवाई! तब्बल 111 किलो चरस जप्त; पोलिसांनी संपूर्ण गावच केलं सील
By ऑनलाइन लोकमत | Published: January 15, 2021 09:13 AM2021-01-15T09:13:26+5:302021-01-15T09:13:47+5:30
Drugs News : पोलिसांनी अमली पदार्थांविरोधातील मोहीम हाती घेतली आहे. याच मोहीमेअंतर्गत पोलिसांना मोठं यश मिळालं असून आतापर्यंतचा सर्वात मोठा अमली पदार्थांचा साठा जप्त केला आहे.
नवी दिल्ली - हिमाचल प्रदेशमध्ये सर्वात मोठी कारवाई करण्यात आली आहे. कुल्लू पोलिसांनीअमली पदार्थांविरोधातील मोहीम हाती घेतली आहे. याच मोहीमेअंतर्गत पोलिसांना मोठं यश मिळालं असून आतापर्यंतचा सर्वात मोठा अमली पदार्थांचा साठा जप्त केला आहे. पोलिसांनी बंजार येथील श्रीकोट पंचायतीमधील शिजाहू गावातून तब्बल 111 किलो चरस जप्त केला आहे. या प्रकरणी पोलिसांनी दोन जणांना अटक केली आहे. तसेच मोठ्या प्रमाणात अमली पदार्थ सापडल्याने संपूर्ण शिजाहू गावच सील करण्यात आलं आहे.
सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, पोलिसांच्या टीमला या गावामध्ये एक चरस माफिया असून त्याच्याकडे मोठ्या प्रमाणात अमली पदार्थांचा साठा असल्याची माहिती मिळाली होती. याच माहितीच्या आधारे पोलिसांनी या अड्ड्यावर छापा टाकला. या छाप्यामध्ये पोलिसांनी एका पुरुषासहीत महिलेलाही अटक केली आहे. या गुन्हा दाखल करण्यात आला आहे. कुल्लूचे पोलीस अधीक्षक गौरव सिंह यांनी गुरुवारी दुपारी दोनच्या सुमारस यासंदर्भातील माहिती दिली आहे. बंजारचे पोलीस उपाधीक्षक बिन्नी मिन्हास यांच्या नेतृत्वाखाली बंजार पोलिसांनी ही कारवाई केली आहे.
बंजार पोलिसांनी याआधीही अशाप्रकारची कारवाई केली असली तरी यंदा सापडलेला साठा हा अमली पदार्थांचा सर्वात मोठा साठा आहे. गेल्या वर्षीही बंजार पोलिसांनी 42 किलो चरस जप्त केलं होतं. त्यावेळी पोलिसांनी चार जणांना अटक केली होती. कुल्लू पोलिसांनी अमली पदार्थांची तस्करी करणाऱ्यांविरोधात मोहीम हाती घेतली असून या अंतर्गत आतापर्यंत अनेक कारवाया करण्यात आल्या आहेत. कारवाई केल्यानंतर या अमली पदार्थांचा पुरवठा करणाऱ्यांच्या संपत्तीसंदर्भातील तपासही केला जात असून आतापर्यंत कुल्लू पोलिसांनी तीन कोटींची बेकायदेशीर संपत्ती जप्त केली आहे. याप्रकरणाचा अधिक तपास सुरू आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.
काँग्रेस नेत्याने मतदार यादीच्या विश्वासार्हतेसंदर्भात उपस्थित केला सवाल, फोटो शेअर करत गंभीर आरोप https://t.co/xAOqZe5lkj#Election#voters
— Lokmat (@MiLOKMAT) January 14, 2021
ऐकावं ते नवलच! एकाच घराच्या पत्त्यावर तब्बल 102 मतदारांची नोंदणी; मतदार यादीत मोठा घोळ
अनेक ठिकाणी मतदार यादीत घोळ झालेला पाहायला मिळतो. अनेकांची नावं ही यादीतून गायब असतात. तर काही ठिकाणी जास्त मतदारांच्या नावाची नोंद असते. अशीच एक घटना आता हिमाचल प्रदेशमध्ये घडली आहे. हिमाचल प्रदेशमधील ऊना जिल्ह्यातील हरोली विधानसभा मतदारसंघातील एकमेव नगरपंचायत असणाऱ्या टाहलीवालमध्येही असाच एक घोळ समोर आला आहे. काँग्रेसचे स्थानिक आमदार मुकेश अग्निहोत्री यांनी यासंदर्भात नाराजी व्यक्त करत मतदार यादीच्या विश्वासार्हतेसंदर्भात सवाल उपस्थित केला आहे.
आमदार मुकेश अग्निहोत्री यांनी आपल्या सोशल मीडियावरील अकाऊंटवरून पंचायतींच्या निवडणुकीसंदर्भात एक पोस्ट शेअर केली आहे. तसेच काही फोटो शेअर करून निवडणुकींमध्ये काहीतरी घोळ असल्याचा आरोप देखील केला आहे. अग्निहोत्री यांनी फेसबुकवर मतदार यादीचा फोटो शेअर करत एकाच घराच्या पत्त्यावर तब्बल 102 मतदारांचं ओळखपत्र बनवण्यात आल्याचा आरोप केला आहे. टाहलीवाल येथील नगर पंचायत निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जारी करण्यात आलेल्या या मतदार ओळखपत्रांमध्ये एकाच घराच्या पत्त्यावर दाखवण्यात आलेल्या मतदारांपैकी अनेकजण हे प्रवासी असल्याची माहिती मिळत आहे.
वीज विभागाचा कारनामा! कंपनीला पाठवलं 3114154015 रुपयांचं वीज बिल; भरलं नाही तर पावणे 6 कोटींचा भरावा लागेल दंडhttps://t.co/5Yx0xhkrVI#electricity#ElectricityBill
— Lokmat (@MiLOKMAT) January 13, 2021
"दिग्विजय सिंह यांचं काम आणि व्यवहार मोहम्मद अली जिनांपेक्षा जास्त धोकादायक" https://t.co/lWyknDiJ15#BJP#MahatmaGandhi#digvijaysing#Congresspic.twitter.com/nWDwGVtMIk
— Lokmat (@MiLOKMAT) January 12, 2021