'माझ्याशी मैत्री कर,नापास होऊ देणार नाही'; शिक्षकाची अल्पवयीन विद्यार्थीनीवर वाईट नजर

By ऑनलाइन लोकमत | Published: February 5, 2023 02:34 PM2023-02-05T14:34:43+5:302023-02-05T14:36:29+5:30

हरियाणातून एक धक्कादायक माहिती समोर आली आहे. एका शिक्षकाची अल्पवयीन विद्यार्थीनीवर वाईट नजर असल्याचे समोर आले आहे. सरकारी शाळेतील रसायनशास्त्र शिक्षकाने विद्यार्थीसोबत छेडछाड केल्याची घटना समोर आली.

kurukshetra govt school chemistry teacher molested minor student ask for friendship at large | 'माझ्याशी मैत्री कर,नापास होऊ देणार नाही'; शिक्षकाची अल्पवयीन विद्यार्थीनीवर वाईट नजर

'माझ्याशी मैत्री कर,नापास होऊ देणार नाही'; शिक्षकाची अल्पवयीन विद्यार्थीनीवर वाईट नजर

googlenewsNext

हरियाणातून एक धक्कादायक माहिती समोर आली आहे. एका शिक्षकाची अल्पवयीन विद्यार्थीनीवर वाईट नजर असल्याचे समोर आले आहे. सरकारी शाळेतील रसायनशास्त्र शिक्षकाने विद्यार्थीसोबत छेडछाड केल्याची घटना समोर आली. शिक्षकाविरोधात पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपी फरार झाला आहे. 

पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, विद्यार्थ्याच्या कुटुंबीयांच्या तक्रारीवरून आरोपी शिक्षकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे. आरोपी शिक्षकावर कारवाई केली जाईल. शाळेनेही आपल्या स्तरावर तपास केला आहे. तक्रारीच्या आधारे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपी शिक्षक शाळेतून सुटी घेऊन फरार झाल्याचे सांगण्यात येत आहे.

धक्कादायक! प्रेयसी बनून प्रेमाचा 'खेळ', मित्रांनीही केलं ब्लॅकमेल; अन् भावी नवरदेवानं संपवलं जीवन

या शिक्षिकाने विद्यार्थीनीचा हात पकडून 'तू अभ्यासात खूप कमकुवत आहेस, माझ्याशी मैत्री कर, मी तुला नापास होऊ देणार नाही', असं म्हटल्याचा आरोप करण्यात आला आहे. मुलीच्या कुटुंबीयांच्या वतीने पोलिसात तक्रार देण्यात आली, त्यानंतर आरोपी शिक्षक फरार आहे.

गावातील 17 वर्षीय अल्पवयीन मुलगी 11वीच्या सरकारी शाळेत शिकत असल्याचे सांगितले जात आहे. 'येथे कार्यरत रसायनशास्त्राचे शिक्षकांची माच्यावर अनेक दिवसांपासून चुकीची नजर ठेवून होती. 'तू माझ्याशी मैत्री कर, मी तुला नापास होऊ देणार नाही, असं शिक्षक बोलल्याचा आरोप विद्यार्थीनीने केला आहे. ही घटना खूप पूर्वी घडली असून, पोलीस कारवाई करत आहेत. 

शाळा सुटल्यानंतर तिने शिक्षिकेच्या या कृत्याबद्दल मैत्रिणीला सांगितले. त्यावर मित्राने संपूर्ण घटनेची माहिती शाळेतीलच एका महिला शिक्षिकेला दिली.  शाळेच्या मुख्याध्यापकांनी हे प्रकरण बालिका समितीकडे चौकशीसाठी सोपवले. पीडित मुलीने हा सगळा प्रकार तिच्या घरच्यांना सांगितल्यावर त्यांनी शाळेत जाऊन शाळेच्या कर्मचाऱ्यांना माहिती दिली आणि पोलिसांत तक्रार दाखल केली.

Web Title: kurukshetra govt school chemistry teacher molested minor student ask for friendship at large

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.