रक्तरंजित थरार! लग्नात डीजेवरुन राडा, नवरीच्या एका भावाचा मृत्यू, दुसऱ्याची मृत्यूशी झुंज
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 20, 2025 17:41 IST2025-02-20T17:40:00+5:302025-02-20T17:41:11+5:30
लग्नात डीजेवर गाणी वाजवण्यावरून झालेल्या भांडणात वधूच्या एका भावाचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे.

फोटो - ABP News
कुशीनगरमधील हाटा कोतवाली भागात लग्नात डीजेवर गाणी वाजवण्यावरून झालेल्या भांडणात वधूच्या एका भावाचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. दुसरा भाऊ रुग्णालयात मृत्यूशी झुंज देत आहे. या घटनेमुळे कुटुंबीयांना मोठा धक्का बसला आहे.
नवरदेवाच्या बाजूचा आणखी एक तरुणही यामध्ये जखमी झाला आहे, ज्याच्यावर उपचार सुरू आहेत. एका छोट्याशा चुकीमुळे लग्नाचं वातावरण शोकाकुल झालं. या मारहाणीत जखमी झालेल्यांची प्रकृती गंभीर असल्याने त्यांना प्राथमिक आरोग्य केंद्र सुकरौली येथे आणण्यात आलं.
प्राथमिक उपचार दिल्यानंतर त्यांना गोरखपूर येथील मेडिकल कॉलेजमध्ये रेफर करण्यात आलं आहे. उपचारादरम्यान, वधूचा एक भाऊ अजयचा मृत्यू झाला आणि दुसरा भाऊ सत्यम रुग्णालयात मृत्यूशी झुंज देत आहे.
या प्रकरणात सीओ कुंदन सिंह यांनी सांगितलं आहे की, लग्नात झालेल्या भांडणाची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी पोहोचून तपास सुरू केला. डीजेवर भोजपुरी गाणी वाजवण्यावरून झालेल्या वादानंतर वर आणि वधूच्या कुटुंबात भांडण झाल्याचं तपासात समोर आलं आहे. हल्ल्याच्या घटनेत, मुलाच्या बाजूच्या लोकांनी मुलीच्या बाजूच्या मुलांवर धारदार शस्त्रांनी हल्ला केला.
या घटनेत मुलीचे दोन भाऊ अजय पासवान आणि सत्यम आणि मुलाच्या बाजूचा रामा पासवान जखमी झाले. अजय पासवान यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेतला आहे आणि तो शवविच्छेदनासाठी पाठवला आहे. कुटुंबातील सदस्यांकडून तक्रार दाखल केल्यानंतर पुढील कारवाई केली जात आहे.
कुशीनगर जिल्ह्यातील हाता कोतवाली भागातील पकौली लाला गावातील रहिवासी लाल मोहन पासवान यांनी त्यांच्या मुलीचं लग्न देवरिया जिल्ह्यातील रुद्रपूर येथे ठरवलं होतं. लग्नाची वरात आली. लग्नाच्या वरातीत डीजेवर भोजपुरी गाणी वाजवण्यावरून वधू आणि वराच्या कुटुंबात वाद झाला, ज्यामध्ये वराच्या बाजूने वधूच्या कुटुंबावर धारदार शस्त्रांनी हल्ला केला.