नात्याला काळीमा! मामीच्या प्रेमात वेडा झाला भाचा; मामाचाच काढला काटा, 'असा' झाला पर्दाफाश
By ऑनलाइन लोकमत | Published: November 26, 2022 12:10 PM2022-11-26T12:10:53+5:302022-11-26T12:12:04+5:30
मामाला आपल्या मार्गातून दूर करण्यासाठी भाच्याने मामाची गोळ्या घालून हत्या केली आहे. या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली आहे.
उत्तर प्रदेशमध्ये नात्याला काळीमा फासणारी घटना घडली आहे. कुशीनगर जिल्ह्यात 13 नोव्हेंबर रोजी एका तरुणाच्या हत्येची खळबळजनक घटना समोर आली आहे. मामीच्या प्रेमात भाचा वेडा झाला आणि प्रेमात अडथळा आणणाऱ्या मामाचाच काटा काढल्याची भयंकर घटना समोर आली आहे. मामाला आपल्या मार्गातून दूर करण्यासाठी भाच्याने मामाची गोळ्या घालून हत्या केली आहे. या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, हत्या केल्यानंतर तो बिहारला पळून गेला.
पोलिसांनी आरोपी रविरंजन आणि त्याचा साथीदार रोहितला अटक करण्यात आली आहे. अटक करण्यात आलेले दोन्ही आरोपी बिहारमधील गोपालगंज जिल्ह्यातील रहिवासी आहेत. कुशीनगर जिल्ह्यातील 13 नोव्हेंबर रोजी अहिरौलीदन टोला लोकनहा येथील वीरसागर गोंड नावाच्या तरुणाची सिसवा अहिरौलीदन रस्त्यावर मोटारसायकलवरून आलेल्या दोन अज्ञात व्यक्तींनी गोळ्या झाडून हत्या केली होती. तरुणाच्या हत्येनंतर संपूर्ण परिसरात एकच खळबळ उडाली आहे. आरोपींना पकडण्यासाठी पोलिसांनी 25 हजारांचे बक्षीस जाहीर केले होते.
पोलिसांनी आरोपींचा शोध सुरू केला. गुरुवारी रात्री उशीरा आरोपी बाघाचौर येथील एपी तटबंदीजवळ आल्याची माहिती पोलिसांना मिळाली. पोलीस आल्यावर त्याला पाहताच रोहित कुमारने गोळीबार सुरू केला. स्वत:चा बचाव करताना पोलिसांच्या पथकाने आरोपीच्या डाव्या पायात गोळी झाडून पकडले. पकडलेल्या आरोपीकडे एक पिस्तूल आणि काडतूस सापडले आहे. त्यानंतर त्यांना जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले.
अटक करण्यात आलेल्या आरोपींपैकी रविरंजनचे त्याच्या मामीवर प्रेम होते. दोघांनाही एकमेकांशी लग्न करायचे होते. पण, मामा विसागर हा दोघांमध्ये अडथळा ठरत होता. त्याला मार्गातून दूर करण्यासाठी रविरंजनने त्याचा मित्र रोहित कुमारला पाठवले, जो त्याच्या गावचा रहिवासी आहे. त्याच्याकडे मदत मागितली. यानंतर रविरंजनने रोहितसोबत 13 नोव्हेंबर रोजी आपल्या मामाची गोळ्या झाडून हत्या केली. पोलिसांनी रविरंजन, रोहितसह मृताच्या पत्नीला अटक केली आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.
सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"