रेल्वेतून गुजरातमधील महिला प्रवाशाची लेडिज बॅग पळविली; ३ लाखांचा ऐवज लंपास

By सूरज.नाईकपवार | Published: August 31, 2023 01:18 PM2023-08-31T13:18:29+5:302023-08-31T13:18:48+5:30

गोव्यातील कोकण रेल्वे पोलिस ठाण्यात तक्रारीची नोंद

Ladies bag of Gujarat woman passenger stolen from train; 3 lakh instead of lumpas | रेल्वेतून गुजरातमधील महिला प्रवाशाची लेडिज बॅग पळविली; ३ लाखांचा ऐवज लंपास

रेल्वेतून गुजरातमधील महिला प्रवाशाची लेडिज बॅग पळविली; ३ लाखांचा ऐवज लंपास

googlenewsNext

सूरज नाईक पवार, मडगाव: रेल्वे प्रवासात अज्ञात चोरटयाने गुजरात येथील एका महिला प्रवाशाला दणका देताना, तिची लॅडीज बॅग लंपास केली. बॅगेत सुवर्णलंकार, मोबाईल व व अन्य वस्तू मिळून तीन लाख साठ हजारांचा ऐवज होता. या प्रकरणी  गोव्यातील कोकण रेल्वे पोलिस ठाण्यात तक्रार नोंद झाली आहे.

पोलिसांनी भादंसंच्या ३७९ कलमाखाली वरील प्रकरण नोंदवून घेतले आहे. पोलिस निरीक्षक सुनील गुडलर यांच्या मार्गदर्शानाखाली उपनिरीक्षक आयेशा म्हामल पुढील तपास करीत आहेत. गुजरात राज्यातील वालसाद वापी येथील विवेकानंद पिल्ले नायर (६३) हे तक्रारदार आहेत. चोरीची घटना २० जून रोजी  गोव्यातील मडगावच्या कोकण रेल्वे स्थानकात घडली होती. तक्रारदार आपल्या पत्नीसमवेत तिरुनवेल्ली हापा एक्सप्रेस रेल्वेतून केरळ राज्यातील कोल्लम येथून वापी वालसाड येथे प्रवास करीत होते. मडगावमध्ये रेल्वे पोहचल्यानंतर अज्ञाताने तक्रारदाराच्या पत्नीचे लेडीज बॅग पळविले.

बॅगेत एक मोबाईल, सोनसाखळी, सोन्याच्या बांगडया, कर्णफुले, तसेच एटीएम कार्ड, आधार कार्डाचे फोटोकॉपी आदी वस्तू होत्या.

Web Title: Ladies bag of Gujarat woman passenger stolen from train; 3 lakh instead of lumpas

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.