लॉरेन्स बिश्रोई गॅंगच्या लेडी डॉनला अटक, आपल्याच पतीची करणार होती हत्या
By ऑनलाइन लोकमत | Published: September 13, 2021 03:23 PM2021-09-13T15:23:09+5:302021-09-13T15:23:49+5:30
मंजू आर्य़ा ऊर्फ मीनूचा मुख्य उद्देश पंजाबच्या जालंधरमध्ये राहणारा तिचा पती आणि झज्जरमधील एका व्यक्तीची हत्या करण्याचा होता.
हरयाणाच्या झज्जर पोलिसांच्या गुन्हे शाखेने लॉरेन्स बिश्रोई गॅंगमधील लेडी डॉनला तिच्या साथीदारासहीत अटक करण्यात आली आहे. ही लेडी डॉन दिल्ली सहीत वेगवेगळ्या राज्यात शस्त्रास्त्र सप्लाय करण्याचं काम करते. मंजू ऊर्फ मीनू नावाने कुख्यात ही लेडी डॉन सोशल मीडियावरही चर्चेत असते. सोशल मीडियावर ती हाती शस्त्रास्त्र घेऊन फोटो शेअर करते तसेच तिचे व्हिडीओही व्हायरल झाले आहे.
मंजू आर्य़ा ऊर्फ मीनूचा मुख्य उद्देश पंजाबच्या जालंधरमध्ये राहणारा तिचा पती आणि झज्जरमधील एका व्यक्तीची हत्या करण्याचा होता. मात्र, तिने हा कारनामा करण्याआधीच पोलिसांना तिला पकडलं. महिलेवर आपल्या साथीदारांसोबत झज्जर आणि रोहतकमध्ये हत्याराच्या धाक दाखवत गाडी लुटल्याचाही आरोप आहे.
काही दिवसांपूर्वी पोलिसांना कंट्रोल रूमवर सूचना मिळाली होती की, झज्जरमधून एक गाडी पळवण्यात आली आहे. या सूचनेनंतर पोलिसांनी हालचाल केली आणि काही दिवसातच गाडीसह दोन आरोपींना ताब्यात घेतलं. अटक करण्यात आलेल्या आरोपींची चौकशी केली. त्यातून खुलासा झाला की, या घटनेत एका लेडी डॉनसोबत इतर चार लोकही सामिल होते.
पोलिसांनी याच माहितीनंतर या घटनेत सहभागी इतर आरोपींचा शोध सुरू केला. यादरम्यान पोलिसांनी मुरादाबादमधून लेडी डॉन मंजू आर्याला पकडलं आणि त्यानंतर दिल्लीतील त्याचा एक साथीदार इकबाल सिंह यालाही अटक केली.
चौकशीतून खुलासा झाला की, त्यांची झज्जरमधील एका व्यक्तीसोबतच लेडी डॉन मीनूच्या पतीची हत्या करण्याची योजना होती. कारण लेडी डॉनचं पतीसोबत पटत नाही आणि त्यामुळे तिला त्याला संपवायचं होतं. पण त्यांना आधीच अटक करण्यात आली.