मुंबईची लेडी सिंघम! 19 व्या वर्षी लग्न झाले, दोन मुले पदरात; IPS चे स्वप्न केले साकार

By ऑनलाइन लोकमत | Published: January 26, 2021 09:27 AM2021-01-26T09:27:02+5:302021-01-26T09:40:35+5:30

Republic Day 2021: काही लोक एक आदर्श बनून अनेकांच्या आयुष्यात प्रकाशाची किरणे पाडतात. आयपीएस अधिकारी एन अंबिका हे असेच एक व्यक्तीमत्व आहे.

Lady Singham of Mumbai! Married at the age of 14, two children at 18; dream of IPS has come true | मुंबईची लेडी सिंघम! 19 व्या वर्षी लग्न झाले, दोन मुले पदरात; IPS चे स्वप्न केले साकार

मुंबईची लेडी सिंघम! 19 व्या वर्षी लग्न झाले, दोन मुले पदरात; IPS चे स्वप्न केले साकार

googlenewsNext

काही लोक एक आदर्श बनून अनेकांच्या आयुष्यात प्रकाशाची किरणे पाडतात. आयपीएस अधिकारी एन अंबिका हे असेच एक व्यक्तीमत्व आहे. त्यांची कहाणी तरुणांना केवळ प्रेरणाच देत नाही तर हे देखील सांगते की, त्यांचे आयुष्य़ आव्हानांनी भरलेले आहे. गुडघे टेकविण्यापेक्षा संकटांचा न डगमगता सामना करायला हवा. आता आयपीएस अंबिका यांना लोक मुंबईची लेडी सिंघम म्हणून ओळखतात. मात्र, 2008 मध्ये हे सारे अशक्यप्राय होते. 


19 वर्षांच्या असताना त्यांचे लग्न झालेे होते. त्या दोन मुलांची आई बनल्या.  एन. अंबिका यांचा जन्म तामिळनाडूच्या खेड्यातील. दहावीत असताना शाळेतील एका कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून आलेल्या तहसीलदारांच्या भाषणाने त्या प्रभावित झाल्या. भविष्यात सरकारी सेवेत रुजू होऊन समाजासाठी काहीतरी करायचे, असे त्यांनी त्याचक्षणी ठरवले. पुढे कला शाखेत प्रवेश घेतला. मात्र शेवटच्या वर्षाला असतानाच त्यांचे लग्न झाले.


घर, संसार सांभाळतानाच अर्धवट राहिलेले स्वप्न पूर्ण करण्यासाठी स्पर्धा परीक्षा देण्याचा निर्णय त्यांनी घेतला. पतीनेही पाठिंबा दिला. दरम्यान, मुलगा झाला. तरीही त्यांनी अभ्यास सुरूच ठेवला. पहिल्यांदा अपयश आले. पुन्हा तयारी सुरू केली. परंतु, अपयश पाठ सोडेना! त्यादेखील जिद्दी होत्या. त्यांनी पुन्हा परीक्षा देण्याची तयारी सुरू केली. दरम्यान, दुसरा मुलगा झाला. संसार, लहानग्यांचे संगोपन आणि स्पर्धा परीक्षा... अशी तारेवरची कसरत सुरूच होती. अखेर मेहनतीला यश आले. पाचव्या प्रयत्नात त्या उत्तीर्ण झाल्या. त्या वेळी एक मुलगा पाच वर्षांचा तर दुसरा वर्षाचा होता. २००९ मध्ये त्या पोलीस सेवेत दाखल झाल्या. अकोला, हिंगोली, नाशिकमध्ये कर्तव्य बाजावल्यानंतर त्यांच्यावर मुंबईच्या परिमंडळ ४च्या उपायुक्त पदाची जबाबदारी आली. दोन वर्षांपासून त्या ही जबाबदारी यशस्वीपणे सांभाळत आहेत. अलीकडेच शहरात गणेशोत्सव पार पडला. लालबागचा राजाच्या दर्शनासाठी लाखो भाविक येतात. गर्दीत चोरी, कायदा-सुव्यवस्था अशा अनेक आघाड्यांवर वरिष्ठ-कनिष्ठ अधिकाऱ्यांच्या साथीने अंबिका यांनी चोख बंदोबस्त ठेवला. कधीकाळी परिमंडळ ४मध्ये सोनसाखळी चोरीच्या सर्वाधिक घटना घडायच्या. अंबिका यांनी अचूक व्यूहरचना आखली. गस्त, बंदोबस्ताची पद्धत बदलली. आरोपी लवकर पकडले जावेत, चोरी मुद्देमाल ज्याचा त्याला परत मिळावा, यासाठी धडपड सुरू असते, असे अंबिका यांनी सांगितले. महिला घराचीच नव्हे, तर देशाच्या संरक्षणाची जबाबदारीही सक्षमपणे पेलू शकतात, हे अंबिका यांनी आपल्या कर्तृत्वातून दाखवून दिले आहे.


परंतू ही वाट सोपी नव्हती. कारण अंबिका यांचे शिक्षण अर्धवट राहिले होते. एका खासगी कोचिंग क्लासमधून आणि नंतर डिस्टंस लर्निंगद्वारे पदवी पूर्ण केली. एवढे सगळे तिने घर, संसार सांभाळून केले तेव्हा कुठे ती आयपीएस बनण्यास पात्र ठरली. 


डिंडीगुलमध्ये आयपीएस परिक्षेसाठी कोणतेही कोचिंग सेंटर नव्हते. अशातच अंबिकाने चेन्नईमध्ये राहून सिव्हिल सर्व्हिस परिक्षेची तयारी करण्याचे ठरविले. पतीनेही तिला साथ दिली. जेव्हा अंबिका चेन्नईला राहत होत्या तेव्हा त्यांचे पती नोकरी करत मुलांनाही सांभाळत होते. 


तीनवेळा नापास झाल्या...
अंबिका आयपीएसची परिक्षा एकदा नाही तर तिनदा नापास झाल्या. मात्र, त्या हरल्या नाहीत. तिच्या पतीला वाटत होते की आता तिने माघारी यावे. मात्र, अंबिका यांनी शेवटचा चान्स घेण्याचे ठरवले आणि 2008 मध्ये त्या पासही झाल्या. आयपीएस अधिकाऱ्याचे ट्रेनिंग पूर्ण केल्यावर त्यांना पहिली पोस्टिंग महाराष्ट्रात मिळाली. आज अंबिका या मुंबईच्या झोन-४ च्या डीसीपी आहेत. 

Web Title: Lady Singham of Mumbai! Married at the age of 14, two children at 18; dream of IPS has come true

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.