बोंबला! शिक्षिकेने आपल्या १३ वर्षीय विद्यार्थ्यासोबत जबरदस्ती केलं 'लग्न', घरात ६ दिवस ठेवलं डांबून!

By ऑनलाइन लोकमत | Published: March 18, 2021 12:56 PM2021-03-18T12:56:25+5:302021-03-18T13:05:02+5:30

तक्रारीनुसार, शिक्षिकेने विद्यार्थ्याला ट्यूशनचं आमिष देत दिवस आपल्या घरात रोखून धरलं आणि लग्न केलं. मात्र, हे लग्न केवळ प्रतिकात्मक होतं.

Lady teacher forcibly married a 13 year old student kept in house for 6 days Jalandhar | बोंबला! शिक्षिकेने आपल्या १३ वर्षीय विद्यार्थ्यासोबत जबरदस्ती केलं 'लग्न', घरात ६ दिवस ठेवलं डांबून!

बोंबला! शिक्षिकेने आपल्या १३ वर्षीय विद्यार्थ्यासोबत जबरदस्ती केलं 'लग्न', घरात ६ दिवस ठेवलं डांबून!

googlenewsNext

जालंधरच्या एका शिक्षिकेने तिच्या १३ वर्षीय विद्यार्थ्यासोबत जबरदस्ती लग्न केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या घटनेबाबत सांगितले जात आहे की, शिक्षिकेचं लग्न जुळत नव्हतं. म्हणून अंधश्रद्धेमुळे महिला शिक्षिकीने हा कारनामा केला. शिक्षिकेला वाटत होतं की, असं करून तिचा मंगळ दोष दूर होईल. अल्पवयीन विद्यार्थ्याच्या परिवाराकडून शिक्षिकेविरोधात पोलिसात तक्रार देण्यात आली आहे. 

तक्रारीनुसार, शिक्षिकेने विद्यार्थ्याला ट्यूशनचं आमिष देत दिवस आपल्या घरात रोखून धरलं आणि लग्न केलं. मात्र, हे लग्न केवळ प्रतिकात्मक होतं. विद्यार्थ्याच्या घरीच आर्थिक परिस्थिती चांगली नाही. शिक्षिकेने विद्यार्थ्याला अभ्यासावर मेहनत घेण्यासाठी आपला घरी ठेवण्याचे सांगितले होते. विद्यार्थ्याच्या घरचेही यासाठी तयार झाले. (हे पण वाचा : शादी डॉट कॉमवरुन ओळख, लग्नाचे आमिष दाखवून बलात्कार)

पोलिसात दिलेल्या तक्रारीत सांगण्यात आले आहे की, विद्यार्थ्याला ६ दिवस जबरदस्ती घरात थांबवून ठेवलं आणि जबरदस्ती त्याच्यासोबत लग्न केलं. हळद-मेहंदी आणि मधुचंद्र याचंही नाटक करण्यात आलं. यानंतर पंडितच्या सांगण्यावरून बांगड्या तोडून विधवा होण्याचंही नाटक या शिक्षिकेने केलं. इतकेच नाही तर शोकसभाही आयोजित करण्यात आली होती.

लग्नाचे रितीरिवाज पूर्ण झाल्यावर विद्यार्थ्याला घरी पाठवण्यात आलं. मुलाच्या घरच्यांचा आरोप आहे की, त्याच्याकडून शिक्षिकेने आणि तिच्या परिवारातील लोकांनी घरातील कामेही करून घेतली. घरी परतल्यावर त्याने घडलेला सर्व प्रकार सांगितला. हे समजल्यावर मुलाच्या घरचे लोक भडकले आणि त्यांनी पोलिसात जाऊन तक्रार दिली. (हे पण वाचा : संतापजनक! जाडी अन् सावळी असल्याचं कारण देत पत्नीला सोडलं; गर्लफ्रेंडशी तुलना करत म्हणायचा.....)

आरोपी शिक्षिका आणि तिला सल्ला देणारे पंडित पोलीस स्टेशनमध्ये पोहोचले. त्यांनी प्रकरण दाबण्याचा प्रयत्न केला. विद्यार्थ्याच्या परिवाराने तक्रार मागेही घेतली. पण हे प्रकरण वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांना समजलं तेव्हा त्यांनी चौकशीचे आदेश दिले.

जालंधऱचे डीएसपी गुरमीत सिंह यांनी मान्य केलं की, अशाप्रकारचं लग्न झालं आहे आणि याची माहिती पोलिसांना आहे. ते म्हणाले की, घटनेची चौकशी केली जात आहे. महिलेवर मुलाला जबरदस्ती घरात ठेवण्याचा आरोप आहे. लग्न भलेही प्रतिकात्मक असेल पण अल्पवयीनासोबत लग्न कायद्याने गुन्हा आहे. (हे पण वाचा : बोंबला ! वरात आली, लोक जेवले झिंगाट नाचले अन् ऐनवेळी नवरीने लग्नास दिला नकार, कारण!)

आरोपी शिक्षिका आणि तिच्या घरच्या लोकांनी पोलिसांना सांगितले की, बरेच प्रयत्न करूनही तरूणीचं लग्न होत नव्हतं. जेव्हा याबाबत पंडीतसोबत बोलणं झालं तर त्यांनी तिला मंगळ दोष असल्याचं सांगितलं. एका प्रतिकात्मक लग्नाने हा दोष दूर केला जाईल असं ते म्हणाले. आता शिक्षिका आणि तिचा परिवारासह पंडीत अडचणीत सापडले आहेत.
 

Web Title: Lady teacher forcibly married a 13 year old student kept in house for 6 days Jalandhar

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.