पिशवीत सापडले लाखोंचे ड्रग्ज; पोलिसांनी पाहून पळ काढण्याआधीच शिताफीने घेतले महिलेला केली अटक

By ऑनलाइन लोकमत | Published: April 24, 2022 07:41 PM2022-04-24T19:41:13+5:302022-04-24T19:52:28+5:30

Drug Seller Women Arrested :

Lakh of rupees of drugs found in bags; Shitafi arrested the woman before the police could flee | पिशवीत सापडले लाखोंचे ड्रग्ज; पोलिसांनी पाहून पळ काढण्याआधीच शिताफीने घेतले महिलेला केली अटक

पिशवीत सापडले लाखोंचे ड्रग्ज; पोलिसांनी पाहून पळ काढण्याआधीच शिताफीने घेतले महिलेला केली अटक

googlenewsNext

मुंबईमुंबई शहरात वाढत असलेल्या अमली पदार्थ विक्री करणारे आणि सेवन करणारे यांना आळा घालण्यासाठी मुंबई पोलिसांनी कंबर कसली आहे. पोलीस ठाणे स्तरावर विशेष पथकाची नियुक्ती करून अमली पदार्थ विक्री करणारे आरोपी यांचा शोध घेऊन अशा प्रकारचे गुन्हयांना आळा घालण्यासाठी व समुळ नष्ट करणेसाठी विशेष मोहीम सुरू करण्याचे पोलीस आयुक्तांनी आदेश दिले आहे. त्याच पार्श्वभूमीवर बोरिवली येथून एम एच बी कॉलनी पोलीसांनी अमली पदार्थांची विक्री करणाऱ्या महिलेस अटक केली आहे. मुस्कान दीपक कनोजिया (२३) असं आरोपी महिलेचे नाव आहे. 

बापरे! कुटुंब संपवलं; २ वर्षाच्या मुलीसह ५ जणांची राहत्या घरात हत्या

काल गुन्हे प्रतिबंधक गस्तीदरम्यान गस्त घालताना पोलीस निरीक्षक किरण सुरसे, सहाय्यक पोलीस निरीक्षक घोडके, गुन्हे प्रकटीकरण अधिकारी पोलीस उपनिरीक्षक संदिप साळवे आणि पथकाने बोरिवली पश्चिम येथील सेंट फ्रांसिस शाळेजवळ, दहिसर नदिकिनारायेथे उभ्या असलेल्या एका महिलेच्या हालचाली संशयीत वाटल्या तसेच तिच्या हातातील छोटया पारदर्शक पिशवीत कोणतीतरी संशयास्पद वस्तू असल्याचा सुगावा लागला. या महिलेने पोलीस पथकास पाहिले आणि  ती तेथून निघून जाण्याच्या तयारीत असताना पोलिसांनी तिला शिताफीने ताब्यात घेतले.या महिलेस पोलिसांनी हिंदी भाषेत संभाषण करून यह बॅग किसका है और उसमे क्या है ? याबाबत विचारणा केली असता तिने तीच्या जवळील पिशवी ही स्वतःची असल्याचे सांगून त्यामध्ये हिरॉईन हा अमली पदार्थ असल्याचे सांगितले. अमली पदार्थाची विक्री करण्याकरीता ती या ठिकाणी आली असल्याचे तिने सांगितले.
 

महिलेजवळून  जप्त हेरॉईनचे वजन 345 ग्रॅम असून त्याची किंमत ५१ लाख ७५ हजार आहे. आरोपी मुस्कान दिपक कनोजीया अमली पदार्थ विक्री करण्यास परवानगी नसताना देखील अमली पदार्थ विक्री करण्यासाठी स्वत: जवळ बाळगले म्हणून आरोपी महिलेविरूध्द एम एच बी कॉलनी पोलीस ठाण्यात  कलम-8 (क) सह 21 (क) एन. डी. पी. एस अॅक्ट 1985 अन्वये गुन्हा नोंद करून नमूद महिलेस गुन्हयात अटक करण्यात आली.

पोलीस दलात खळबळ, नैराश्यग्रस्त पोलीस कर्मचाऱ्याने गळफास घेऊन संपवले आयुष्य


नमूद आरोपीत महीलेचा अधिक कोणत्या गुन्ह्यात सहभाग आहे का तसेच नमूद महिलेचे इतर सहकारी मुंबईमध्ये आणखी कोणत्या ठिकाणी अमली पदार्थ विक्री करीत आहेत किंवा कसे याबाबत अधिक तपास करून इतर आरोपीत इसमांना पोलीस अटक करत आहेत. या गुन्ह्याचा तपास पोलीस निरीक्षक किरण सुरसे करत असून वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली पुढील तपास चालू आहे.

Web Title: Lakh of rupees of drugs found in bags; Shitafi arrested the woman before the police could flee

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.