लाखोंचे दागिने, सोन्याची भांडी आणि महागडी घड्याळे, ९ अधिकाऱ्यांच्या घरांवर टाकलेल्या धाडीत सापडले घबाड
By ऑनलाइन लोकमत | Published: March 9, 2021 02:03 PM2021-03-09T14:03:11+5:302021-03-09T14:04:39+5:30
लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने केलेल्या छापेमारीमध्ये मोठे घबाड तपास अधिकाऱ्यांच्या हाती लागले आहे. नऊ अधिकाऱ्यांविरोधात ही कारवाई करण्यात आली.
बंगळुरू - कर्नाटकमध्ये लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने केलेल्या छापेमारीमध्ये मोठे घबाड तपास अधिकाऱ्यांच्या हाती लागले आहे. नऊ अधिकाऱ्यांविरोधात ही कारवाई करण्यात आली. या कारवाईमध्ये दागदागिने, सोन्याची भांडीकुंडी आणि महागडी घड्याळे हस्तगत करण्यात आली. (Lakhs of jewelery, gold utensils and expensive watches, 9 officers' houses raided)
कर्नाटक अँटी करप्शन ब्युरोने राज्यातील विविध भागांत छापेमारी करण्यात आली. सुमारे ५२ अधिकारी आणि १७२ कर्मचाऱ्यांच्या एका पथकाने ११ जिल्ह्यांतील २८ ठिकाणांवरून नऊ अधिकाऱ्यांविरोधात बेहिशेबी मालमत्तेप्रकरणी हे छापे टाकण्यात आले. कर्नाटक भ्रष्टाचार विरोधी पथकाने दिलेल्या माहितीनुसार या छापेमारीदरम्यान, म्हैसूरमधील सुपरिटेंडेंट इंजिनियर के.एम. मुनी गोपाल राजू यांच्या घरात छापेमारी करण्यात आली. त्यांच्या घरातून दागदागिने, महागडी घड्याळे आणि सोन्याचे दागिने सापडले.
Cash, jewellery, expensive watches and gold utensils recovered during ACB's raid at CESCom Superintendent Engineer KM Munigopal Raju's house in Mysore, Karnataka pic.twitter.com/L3Bi35sScc
— ANI (@ANI) March 9, 2021
दरम्यान, काही दिवसांपूर्वी बॉलीवूड डायरेक्टक अनुराग कश्यप, अभिनेत्री तापसी पन्नू आणि मधू मनटेना यांच्यासह अनेक सिने कलाकारांच्या घरांवर प्राप्तिकर विभागाने छापा टाकला होता. ही छापेमारी फँटम चित्रपटाच्या करचोरी संदर्भात करण्यात आली होती. या कारवाईवरून राहुल गांधी यांनी केंद्र सरकारवर प्रश्न उपस्थित केला होता.