गुंतवणूकीवर दुप्पट परताव्याचे आमिष दाखवून तिघांना लाखोंचा गंडा
By ऑनलाइन लोकमत | Published: July 16, 2020 04:33 PM2020-07-16T16:33:54+5:302020-07-16T16:40:35+5:30
याप्रकरणी चेतन दंड याच्याविरोधात टिळकनगर पोलिस ठाण्यात दाखल तक्रारीवरून फसवणूकीचा गुन्हा दाखल झाला आहे.
डोंबिवली: गुंतवणूक केल्यास दरमहा पाच टकके तर एका वर्षात दुप्पट परतावा मिळेल असे आमिष दाखवित तिघा गुंतवणूकदारांना एकूण 52 लाख 90 हजारांना गंडा घालण्यात आल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी चेतन दंड याच्याविरोधात टिळकनगर पोलिस ठाण्यात दाखल तक्रारीवरून फसवणूकीचा गुन्हा दाखल झाला आहे.
गोग्रासवाडी परिसरात राहणा-या चेतनने त्याच्या आईचे नावाची देसर इन्वेसमेंट ही गुंतवणूक स्किम चालू केली. यात गुंतवणूक केल्यास दरमहा 5 टकके दराने परतावा मिळेल अशी सोशल मिडीयावर जाहिरात दिली. ही जाहीरात बघून ठाणो येथे राहणारे निर्मल शहा यांनी चेतनशी संपर्क साधला. दरमहा 5 टकके दराने तसेच एका वर्षात दुप्पट परतावा देण्याचे आश्वासन देवून शहा यांच्याकडून रककम स्विकारण्यात आली. काही काळ ठरल्याप्रमाणो पैसे ही शहा यांना परत करण्यात आले. परंतू नोव्हेंबर 2019 पासून कोणताही परतावा चेतनने दिलेला नाही अथवा मुद्दल देखील परत केलेली नाही. त्यांच्या परिवाराची तब्बल 25 लाख 20 हजाराची फसवणूक केल्याचा आरोप शहा यांचा आहे. शहा यांच्याप्रमाणोच प्रिती ठककर यांच्या परिवाराची 22 लाख 80 हजार आणि मेहुल भट यांचे 4 लाख 90 हजार अशा तिघा गुंतवणूकदारांची एकुण 52 लाख 90 लाखांची फसवणूक केल्याची तक्रार चेतन विरोधात टिळकनगर पोलिस ठाण्यात करण्यात आली आहे. या तिघा गुंतवणुकदारांप्रमाणे ठाणे, नवीमुंबई, मुंबई तसेच गुजरात राज्यामध्ये देखील लोकांना पैसे गुंतवण्यास परावृत्त करून त्यांची देखील मोठया प्रमाणात आर्थिक फसवणूक केल्याचा संशय व्यक्त करण्यात आला आहे.
अन्य महत्वाच्या बातम्या...
लॉकडाऊनमध्ये नोकरीच्या बहाण्याने तरुणीवर बलात्कार; पीडितेला घरात डांबून ठेवलं
निंदनीय प्रकार भोवला! मनसेच्या अविनाश जाधव यांच्यासह अन्य पदाधिकाऱ्यांवर गुन्हा दाखल
ताई मला वाचव! हबीब मला मारून टाकेल; रिदाने मृत्यूपूर्वी केला होता व्हिडिओ कॉल, म्हणाली होती...
हत्येनंतर चोराने बलात्कार केला; विवस्त्र मृतदेहाला फ्रिजमध्ये ठेवायचा प्रयत्न फसला
९० वर्षीय नवऱ्याला रॉकेल टाकून पेटवले अन् स्वत:ही जीव सोडला; कारण ऐकून धक्का बसेल