स्टेट बँकेचं एटीएम फोडून लाखो रूपये लंपास 

By ऑनलाइन लोकमत | Published: July 30, 2021 03:11 PM2021-07-30T15:11:18+5:302021-07-30T15:12:26+5:30

अज्ञान चोरट्यानं मध्यरात्री लंपास केली रक्कम. १९ लाखांच्या जवळपास रक्कम मशीनमध्ये असल्याचा अंदाज.

Lakhs of rupees were stolen from a State Bank ATM | स्टेट बँकेचं एटीएम फोडून लाखो रूपये लंपास 

स्टेट बँकेचं एटीएम फोडून लाखो रूपये लंपास 

Next
ठळक मुद्देअज्ञान चोरट्यानं मध्यरात्री लंपास केली रक्कम. १९ लाखांच्या जवळपास रक्कम मशीनमध्ये असल्याचा अंदाज.

पळशी बु : बाळापूर ते लाखनवाडा या मार्गावर येत असलेल्या पळशी बु येथे अज्ञात चोरट्याने भारतीय स्टेट बँकेचे ए टी एम फोडून लाखो रुपये लंपास केले. ३० जुलै रोजी ही घटना उघडकीस आली. 

खामगाव ग्रामीण पोलीस स्टेशन अंतर्गत येत असलेल्या बाळापूर ते लाखनवाडा या मार्गावरील पळशी बु येथील भारतीय स्टेट बँकेचे एटीएम असून शुक्रवार ३० जुलै रोजी पहाटे अज्ञात चोरट्याने हे एटीएम गॅस कटरच्या सहाय्याने तोडून त्यामधून जवळपास १९ लक्ष रुपये लंपास केल्याची माहीती एटीएम कंपनीतील इलेक्ट्रॉनिक पेमेंट सिस्टीमचे कर्मचारी गजानन महादू सोनुने यांनी दिली. या एटीएम कंपनीने गुरुवार दि २८ जुलै रोजी दुपारी दहा लाख रुपये टाकले व आधीचे दहा लाख असे एकूण वीस लाख रुपये या मशीन मध्ये होते.

त्या मधून एक लक्ष रुपये ग्राहकांनी काढले केले असतील तरी ही जवळपास १९ लाख रुपये लंपास झाल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे. या वेळी खामगाव ग्रामीण पोलीस स्टेशनचे ठाणेदार रफिक शेख हे सकाळीच घटना स्थळी पोहचून घटनेची पाहणी केली. तसंच त्यांनी श्वान पथकास पाचारण करून श्वान कडून प्राथमिक तपास केला. पुढील तपास खामगाव ग्रामीण पोलीस स्टेशनचे ए एस आय गणेश जाधव करत आहेत. विशेष रात्री ३ वाजता येथील सर्व लाईट बंद झाली होती.

Web Title: Lakhs of rupees were stolen from a State Bank ATM

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.