राज्य सरकार अन् मुंबई पोलिसांच्या बदनामीसाठी वापरलेली लाखो ट्विटर अकाऊंट संशयाच्या फेऱ्यात 

By पूनम अपराज | Published: November 3, 2020 09:17 PM2020-11-03T21:17:43+5:302020-11-03T21:19:28+5:30

Cyber Crime : लवकरच या कटामागील आरोपींवर कारवाई करणार असल्याचे सायबर पोलीस उपायुक्त रश्मी करंदीकर यांनी सांगितले होते.

Lakhs of Twitter accounts used to defame the state government and Mumbai police are under suspicion | राज्य सरकार अन् मुंबई पोलिसांच्या बदनामीसाठी वापरलेली लाखो ट्विटर अकाऊंट संशयाच्या फेऱ्यात 

राज्य सरकार अन् मुंबई पोलिसांच्या बदनामीसाठी वापरलेली लाखो ट्विटर अकाऊंट संशयाच्या फेऱ्यात 

Next
ठळक मुद्दे८० टक्के ट्विटर अकाऊंटवरून मुंबई पोलीस आणि राज्य सरकारची बदनामी नकारात्मक प्रतिमा तयार करणारे ट्वीट आणि रिट्वीट आणि पोस्ट करण्यात आल्या होता असल्याचे महाराष्ट्र पोलिसांनी आढळून आलं आहे.

मुंबई - सायबर तज्ज्ञांच्या पथकाला तपासादरम्यान १. ५० लाखांहून अधिक ट्विटर अकाउंट आढळून आली. त्यापैकी ८० टक्के ट्विटर अकाऊंटवरून मुंबई पोलीस आणि राज्य सरकारची बदनामी नकारात्मक प्रतिमा तयार करणारे ट्वीट आणि रिट्वीट आणि पोस्ट करण्यात आल्या होता असल्याचे महाराष्ट्र पोलिसांनी आढळून आलं आहे.

अभिनेता सुशांतसिंह राजपूत आत्महत्याप्रकरणी मुंबई पोलिसांची बदनामी करण्यासाठी सोशल मीडियावर तयार करण्यात आलेल्या ८० हजार बनावट अकाऊंटविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यात ट्विटर, इंस्टाग्राम, फेसबुकवरच्या अकाउंट्सचा समावेश आहे. लवकरच या कटामागील आरोपींवर कारवाई करणार असल्याचे सायबर पोलीस उपायुक्त रश्मी करंदीकर यांनी सांगितले होते.

हायकोर्टात धाव
या बनावट अकाउंटवरून मुंबई पोलिसांची बदनामी, शिवीगाळ करण्यात येत होती. विशेष म्हणजे, पोलीस आयुक्तालयाच्या नावेही बनावट अकाउंट काढले होते. काही वृत्तसंस्थांनीही चुकीच्या पद्धतीने तपास दाखवून पोलिसांची बदनामी केली. त्याविरुद्ध काही निवृत्त पोलीस अधिकाऱ्यांनी उच्च न्यायालयात धाव घेतली. न्यायालय योग्य भूमिका घेईल, असे पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांनी सांगितले होते.

सुशांतचे कुटुंबीय संशयाच्या भोवऱ्यात!
अभिनेता सुशांत ड्रग्ज घ्यायचा हे मुंबई पोलिसांच्याही तपासात समोर आले होते. तसेच सुशांतच्या तणावाबाबत त्याची बहीणच तोतया डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार औषध देत असल्याचेही उघडकीस आले होते. त्यासंदर्भातील वर्ग केलेल्या गुन्ह्याचा सीबीआय योग्य तपास करेल, असा विश्वास पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांनी व्यक्त केला. 

Web Title: Lakhs of Twitter accounts used to defame the state government and Mumbai police are under suspicion

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.