ललित जाणार होता श्रीलंकेत; कर्नाटकमधून चेन्नईमार्गे पळून जाण्याचा आखला होता प्लॅन 

By ऑनलाइन लोकमत | Published: October 19, 2023 08:29 AM2023-10-19T08:29:20+5:302023-10-19T08:30:02+5:30

चाकण परिसरातील शेलपिंपळ गाव येथे ७ ऑक्टोबर २०२० रोजी २० कोटी रुपयांचे २० किलो मॅफेड्रोनसोबत पकडले होते. त्याच प्रकरणातील प्रमुख आरोपी ललितची रवानगी येरवडा कारागृहात झाली होती.

Lalit patil was going to Sri Lanka; The plan was to escape from Karnataka via Chennai | ललित जाणार होता श्रीलंकेत; कर्नाटकमधून चेन्नईमार्गे पळून जाण्याचा आखला होता प्लॅन 

ललित जाणार होता श्रीलंकेत; कर्नाटकमधून चेन्नईमार्गे पळून जाण्याचा आखला होता प्लॅन 

- नितीश गोवंडे
लोकमत न्यूज नेटवर्क
पुणे : ड्रग्ज प्रकरणाचा मास्टरमाइंड ललित पाटील ससून रुग्णालयामधून पसार झाल्यानंतर पुणे पोलिसांची १० पथके त्याच्या मागावर होती. यासह मुंबई आणि नाशिक पोलिसदेखील त्याचा शोध घेत होते. बुधवारी कर्नाटकातून चेन्नईला पळून जाऊन तेथून श्रीलंकेत जाण्याचा प्लॅन ललितने आखला होता. तत्पूर्वीच मुंबई पोलिसांना मोठ्या शिताफिने त्याच्या मुसक्या आवळल्या.

चाकण परिसरातील शेलपिंपळ गाव येथे ७ ऑक्टोबर २०२० रोजी २० कोटी रुपयांचे २० किलो मॅफेड्रोनसोबत पकडले होते. त्याच प्रकरणातील प्रमुख आरोपी ललितची रवानगी येरवडा कारागृहात झाली होती. या कारवाईत  २२ आरोपींना पकडण्यात आले होते; परंतु, या कारवाईच्या तिसऱ्या दिवशी ललितने जिन्यातून पडल्याचे कारण सांगून ससूनचा रस्ता धरला होता. 

बंद कारखान्यांमध्ये बनवत होते ड्रग्ज
nप्रामुख्याने मॅफेड्रोन हे ड्रग्ज बाहेरच्या देशातून भारतात आणले जाते. ललितकडे मात्र हे ड्रग्ज बनवण्यासाठी तज्ज्ञांची टीम होती. त्याचा भाऊ भूषण ‘एमडी’ उत्पादन करत असल्याचे समोर आले. 
nललितने याआधी रांजणगाव येथील कारखान्यात १३२ किलो मॅफेड्रोन बनविले होते, त्यातील ११२ किलो मॅफेड्रोन त्याने विकले होते, तर २० किलो पोलिसांना सापडले होते.
nपुढे ललित, भूषण यांच्या नाशिक येथील शिंदे गावातील कारखान्यावर पोलिसांनी छापा मारत ३०० किलोचे एमडी जप्त केले.

फरार झाल्यानंतर पहिल्यांदा नाशकातच
पुण्याहून फरार झाल्यानंतर  तो थेट नाशकात आला आणि येथील त्याच्या निकटवर्तीय महिलेकडे रात्रभर मुक्काम ठोकला होता. 
तिच्याकडून २५ लाखांची रोकड घेऊन तो नाशकातून बाहेर पडला, अशी माहिती नाशिक पोलिसांच्या तपासातून समोर आली आहे.

केमिकल इंजिनिअर ते ड्रग माफिया
ललित अनिल पाटील ऊर्फ पानपाटील हा मूळचा नाशिकचा आहे. बोकड एक्स्पोर्टचा व्यवसाय करत तो ड्रग्ज व्यवसायात उतरला ललितचा भाऊ भूषण हा केमिकल इंजिनीअर असून तोच एमडी ड्रग्ज तयार करत होता. ड्रग्जच्या गुन्ह्यात येरवडा कारागृहात असणाऱ्या अरविंदकुमार लोहारे याने भूषण याला ड्रग्ज बनवण्याचे प्रशिक्षण दिले होते.  तसेच अभिषेक बलकवडे हा भूषणसोबत आर्थिक व्यवहार पाहत होता.

ससूनपासून बंगळुरूपर्यंत
कधी काय घडले?
n३० सप्टेंबर : ससून रुग्णालयाच्या गेटजवळ २ कोटी १४ लाखांचे मॅफेड्रॉन जप्त.
nड्रग्ज प्रकरणाचा मास्टरमाइंड  ललित पाटील याच्याजवळ २ मोबाइल सापडले.
n१ ऑक्टोबर : ललित पाटील ससूनमधून पळाला. 
n२ ऑक्टोबर : ललितला पळवून लावण्यासाठी ससूनमधील विद्युतपुरवठा बंद केल्याची माहिती समोर. ससूनचे अधिष्ठाता डॉ. संजीव ठाकूर यांच्यावरदेखील प्रश्नचिन्ह.
n६ ऑक्टोबर : ललित नेहमी ससूनमधून जवळच्याच पंचतारांकित हॉटेलमध्ये जात असल्याचे सीसीटीव्ही फूटेजवरून स्पष्ट.
n७ ऑक्टोबर : पलायन प्रकरणाचा अहवाल विभागीय आयुक्तांकडे सादर.
n८ ऑक्टोबर : ललितला राजकीय पाठबळ असल्याच्या आरोपांना सुरुवात.
n९ ऑक्टोबर : एका महिला पोलिस उपनिरीक्षकासह ९ कर्मचाऱ्यांचे निलंबन, केले,
n११ ऑक्टोबर : ललितचा भाऊ भूषण पाटील आणि त्याचा साथीदार अभिषेक बलकवडे या दोघांना पुणे पोलिसांनी नेपाळ बॉर्डरजवळून अटक केली.
n१४ ऑक्टोबर : ललितने एकूण ७० लाख रुपये वाटल्याची पोलिस दलात चर्चा. चौकशी समितीने ८० जणांचे जबाब नोंदवले.
n१८ ऑक्टोबर : ललित पाटील याला मुंबईच्या साकीनाका पोलिसांनी बंगळुरू येथून केली अटक.

कायदेशीर कारवाई करा एन्काउंटर नको : आई
नाशिक : दोघा मुलांनीही चूक झाली असे सांगून गुन्ह्याची कबुली द्यावी, पुन्हा आता असे होणार नाही, असे सांगून एक संधी मागावी,’ असा सल्ला ललित व भूषण या दोन्ही मुलांना त्यांची आई भाग्यश्री पाटील ऊर्फ पानपाटील यांनी दिला. कायदेशीर कारवाई करावी; एन्काउंटर करू नये, असेही त्या म्हणाल्या
 

Web Title: Lalit patil was going to Sri Lanka; The plan was to escape from Karnataka via Chennai

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.