सूप विक्रीसाठी आलेल्या महिलेचा बटवा लंपास; १९ हजार रुपयांची चोरी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 26, 2020 11:50 PM2020-08-26T23:50:56+5:302020-08-26T23:51:05+5:30
वडखळ पोलिसांनी त्या मुलीची तपासणी केली असता, तिच्याकडे ९१ हजार ६९२ रु पयांची रोकड सापडली.
अलिबाग : गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर सूप विक्रीसाठी आलेल्या महिलेचा ९१ हजार रुपयांच्या रोकडसहीत बटवा लंपास करण्यात आला होता. अलिबाग एसटी स्थानकातील वाहक, तक्र ारदार व अलिबाग व वडखळ पोलिसांच्या सतर्कतेमुळे अवघ्या काही तासांत चोरीचा गुन्हा उघडकीस आला. ही घटना सोमवारी घडली.
पुणे जिल्ह्यातील मारगासनी येथील आशा जाधव गणेशोत्सवाच्या सणानिमित्त १८ आॅगस्ट रोजी नातेवाइकासमवे सूप विकण्यासाठी अलिबागमध्ये आली होती. दिवसभर सूप विकून झाल्यावर अलिबाग एसटी स्थानकातील सिमेंट कठड्यावर कुटुंबीयांसमवेत राहत होत्या. २३ आॅगस्ट रोजी संध्याकाळी सूप विकून झाल्यावर, रात्री साडेदहा वाजण्याच्या सुमारास झोपल्या. त्यांच्या बाजूच्या कठड्यावर एक मुलगीदेखील झोपली होती. २४ आॅगस्ट रोजी सकाळी उठल्यावर मुलगी दिसून आली नाही, तसेच अशा यांचा पैशांचा बटवाही गायब झाला होता. त्यामुळे तातडीने अलिबाग पोलीस ठाण्यात जाऊन
तक्र ार केली. ही बाब एसटीतील काही कर्मचाऱ्यांनाही समजली. अलिबाग आगारातून सकाळी पावणेसहा वाजण्याच्या सुमारास पनवेलकडे जाणाºया एसटीतील वाहक प्रसन्न पाटील प्रवाशांचे तिकीट फाडत असताना एका मुलीकडे पैशांचा बंडल दिसून आले. त्या मुलीकडे इतकी रक्कम कशी, असा प्रश्न प्रसन्न पाटील यांना पडला. त्यांना चालकाला एसटी वडखळ पोलीस ठाण्याकडे वळविण्यास सांगितली.
वडखळ पोलिसांनी त्या मुलीची तपासणी केली असता, तिच्याकडे ९१ हजार ६९२ रु पयांची रोकड सापडली. तिला ताब्यात घेतले असून, तिच्याविरोधात अलिबाग पोलीस ठाण्यात तक्र ार दाखल करण्यात आली आहे. ही मुलगी १७ वर्षांची असून, ती पेण तालुक्यातील कांदळेपाडा येथे राहते, ती सराईत गुन्हेगार आहे. तिच्याविरोधात वडखळ व पेण पोलीस ठाण्यात यापूर्वीही गुन्हे दाखल असल्याची माहिती पोलिसांकडून देण्यात आली आहे.